Apple WWDC 2023 : कॅलिफोर्नियाची टेक कंपनी ॲपल (Apple) ने नुकतंच iOS 17 व्हर्जन लाँच केलं आहे. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम अनेक जुन्या iPhone ला सपोर्ट करणार नाही आहे. ॲपल (Apple) कंपनीची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद (WWDC 2023) सुरू आहे. यामध्ये कंपनीने नवीन तंत्रज्ञान आणि डिव्हाईस लाँच केले आहेत. अलिकडेच ॲपलने नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 17 लाँच केली आहे. या नवीन ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अनेक आधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान, ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम काही आयफोन्समध्ये चालणार नाही. या यादीत कोणते आयफोन आहेत, ते जाणून घ्या...


कोणत्या आयफोनमध्ये येणार iOS 17 अपडेट?


iPhone 14 Series


आयफोन 14 सीरीजमधील आयफोन्समध्ये नवीन iOS 17 अपडेट्स आणि फिचर्सचा फायदा मिळेल. ॲपलने  मागील वर्षी लॉन्च केलेल्या iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max या चार मॉडेल्सना iOS 17 अपडेट मिळणार आहे. 


iPhone 13 Series


iPhone 13 लाईनअपमधील सर्व मॉडेल्समध्ये iOS 17 अपडेट मिळेल. यामध्ये iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro, आणि iPhone 13 Pro Max यांचा समावेश आहे. हे आयफोन फ्लॅट एज डिझाइन आणि 5G कनेक्टिव्हिटीसह येतात, निवडक फिचर्स वगळता जुन्या iPhone 13 मॉडेलमध्येही iOS 17 चं अपडेट मिळेल.


iPhone 12 Series


ॲपलच्या पहिल्या 5G कनेक्टिव्हिटीसह येणार्‍या सीरिजमधील चारही मॉडेल iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांमध्ये Apple चं नवं iOS 17 सॉफ्टवेअर अपडेट मिळेल. तीन वर्षे जुन्या डिव्हाइसमध्ये आतापर्यंत कंपनीने सर्व नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स दिले आहेत. 


iPhone 11 Series


तुमच्याकडे iPhone 11, iPhone 11 Pro किंवा iPhone 11 Pro Max असल्यास यामध्येही तुम्हाला iOS 17 सॉफ्टवेअर अपडेटचा लाभ घेता येईल. 


iPhone XS/XS Max, iPhone XR


सुमारे पाच वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या हे आयफोन आजही लाखो युजर्स वापर आहेत, यामुळे कंपनी iPhone XS/XS Max, iPhone XR या सीरीजमध्येही iOS 17 सपोर्ट दिला आहे. पण हार्डवेअरच्या मर्यादांमुळे युजर्संना सर्व नवीन फिचर्स वापरता येणार नाहीत.


iPhone SE


गेल्या वर्षी Apple ने शक्तिशाली A15 बायोनिक प्रोसेसरसह परवडणारे iPhone SE आणले होते. iPhone SE मध्ये तुम्हाला नवं iOS 17 ऑपरेटिंग सिस्टिम वापरता येईल. 3RD जनरेशन iPhone SE ला देखील बहुतेक नवीन फिचर्सचा लाभ मिळू शकतो.


'या' आयफोनला सपोर्ट करणार नाही iOS 17 


iOS 17 ऑपरेटिंग सिस्टिमसाठी A12 बायोनिक चिपची आवश्यकता आहे. त्यामुळे हे नवीन iOS अपडेट iPhone 8, iPhone 8 Plus, आणि iPhone X या आयफोनमध्ये मिळणार नाही.