Android Phone Update : अँड्रॉईड (Android) मोबाईलमधील (Mobile) यूजर्सची सर्वात मोठी तक्रार ही जाहिरातींबाबत (Advertisement)सते.साधारणपणे जे स्मार्टफोन बजेट फ्रेंडली असतात किंवा मिड रेंजचे असतात अशा मोबाईलमध्ये ही समस्या जास्त जाणवते. यामध्ये स्मार्टफोन यूजर्सना अनेक प्रकारच्या जाहिराती मिळतात. चांगली गोष्ट म्हणजे अँड्रॉईड मोबाईलमध्ये एक हिडन फीचर आहे. या फीचरच्या माध्यमातून जाहिराती बंद केल्या जाऊ शकतात. यानंतर कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्सची गरज नाही. हे फीचर खाजगी DNS चे आहे. खाजगी डोमेन नेम प्रणालीद्वारे,यूजर्स मोबाईल अशा प्रकारे वापरू शकतात आणि कॉन्फिगर करू शकतात. ज्या माध्यमातून मोबाईलवर जाहिराती ब्लॉक केल्या जाऊ शकतात.


या पद्धतीद्वारे तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्सची गरज भासणार नाही आणि यामुळे तुम्हाला जाहिरातींपासूनही दिलासा मिळेल. यामध्ये हे (Enable) कसं करायचं ते जाणून घेऊयात. 


अँड्रॉईड स्मार्टफोन्समधील जाहिराती सहजपणे कशा ब्लॉक करायच्या?


तुमच्या मोबाईलमधील जाहिराती ब्लॉक करण्यासाठी, सर्वात आधी डिव्हाईसमधील सेटिंग्जवर जा. त्यानंतर कनेक्शन वर जा. यानंतर तुम्हाला More Connection Settings मध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट डीएनएस ऑप्शनवर टॅप करावं लागेल.


या ऑप्शनवर टॅप करून तुम्हाला private DNS पत्ता प्रविष्ट करण्यास सूचित केले जाईल. येथे रिकाम्या बॉक्समध्ये तुम्हाला dns.adguard.com लिहावं लागेल. यानंतर तुम्हाला सेव्ह वर टॅप करावे लागेल.


हे केल्यानंतर तुमचा मोबाईल रीस्टार्ट होईल. मग तुम्हाला ॲप्स आणि ब्राउझरमध्ये जाहिराती दिसणार नाहीत. तसेच, हे लक्षात ठेवा की तुम्हाला अजूनही Spotify किंवा YouTube सारख्या ॲप्समध्ये जाहिराती दिसतील. कारण, यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन (Premium Subscription) आवश्यक आहे. पण, जर तुम्ही आपण बऱ्याचदा अशा साईटला भेट दिल्यास जिथे भरपूर जाहिराती आहेत त्या तुम्हाला आता दिसणार नाहीत. 


कधीकधी असं होऊ शकतं की या युक्तीमुळे एखादी महत्त्वाची साईट ओपन होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला सेटिंग्ज->नेटवर्क आणि इंटरनेट->खाजगी DNS वर परत जावं लागेल आणि ते बंद करावं लागेल.


या पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर अनेकदा विनाकारण येणाऱ्या जाहिरातींचा त्रास अगदी सहजपणे दूर होईल. आणि व्हिडीओ बघताना जाहिरातींचा त्रासही होणार नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Boult Z40 Ultra : प्रीमियम डिझाईन आणि AI फीचर; 100 तास नॉन-स्टॉप प्ले करणारे 'हे' इयरबड्स तुम्ही पाहिलेत का?