Android 15 Developer Preview : Google ने Android 15 चा पहिला डेव्हलपर प्रीव्यू रोलआऊट केला आहे. या प्रिव्ह्यूमुळे आगामी काळात अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलेल याची झलक पाहायला मिळते. कंपनी या ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक नवीन फीचर्स जोडणार आहे. हे प्रीव्यू पुढील प्रमुख रिलीजसाठी काही महत्त्वाचे बदल आणि सुधारणांची लवकर झलक देतील अशी अपेक्षा आहे. 


कॅमेरा टूल्स अधिक चांगले असणार 


आगामी Android 15 मध्ये कॅमेरा टूल्स अधिक चांगले केले जातील. डेव्हलपर्स प्रीव्यूवरून हे लक्षात येतं की,Google ने यूजर्सचा फोटोग्राफी अनुभव सुधारण्यासाठी कार्य केले आहे. एक प्रमुख जोड म्हणजे ॲप-मधील कॅमेरा नियंत्रणे सुधारित करणे, ज्यामुळे विकासकांना ब्राइटनेस, फ्लॅश तीव्रता आणि इतर इमेजिंग वैशिष्ट्यांवर अधिक तपशीलवार शक्ती मिळते जी पूर्वी डीफॉल्ट कॅमेरा ॲप्सपुरती मर्यादित होती.


कडक सुरक्षा असणार 


आगामी काळात Android 15 मध्ये कंपनी यूजर्ससाठी त्यांच्या सुरक्षिततेची देखील काळजी घेणार आहे. Android 14 च्या तुलनेत, हे सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या बाबतीत बरेच सुधारले जाईल. यामध्ये Privacy Sandbox नावाचे फीचर असेल. याशिवाय, अपडेटमध्ये आणखी काही गोष्टी दिसतील ज्या यूजर्ससाठी पूर्णपणे नवीन असतील.


कधी रिलीज होणार? 


गुगलने अपडेट रिलीज करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.पण,याचे सर्वात फायनल अपडेट हे ऑगस्ट महिन्यात लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे. कारण कंपनीने फेब्रुवारीमध्ये डेव्हलपर्स प्रिव्ह्यू सादर केला आहे. यानंतर, दुसरा डेव्हलपर्स प्रीव्यू सादर केला जाईल आणि त्यानंतर तो बीटा 1 साठी रोलआऊट केला जाईल. यानंतर आणखी काही बीटा व्हर्जन रिलीज केले जातील.  यानंतर ते स्टेबल यूजर्ससाठी उपलब्ध केले जातील. 


महत्त्वाच्या बातम्या : 


OnePlus 12R Smartphone : OnePlus 12R खरेदी केलेल्या ग्राहकांना कंपनी पूर्ण रिफंड करणार; नेमकी भानगड काय?