Android 14 Launch : Google कायमच आपल्या यूजर्सकरता काही ना काही भन्नाट लाँच करत असते. आता पुन्हा एकदा टेक कंपनी Google ने  पिक्सेल (Pixel) स्मार्टफोनबद्दल माहिती दिली आहे. कंपनी येत्या 4 आॅक्टोंबरला पिक्सेल सीरिज (Series) लाँच करणार आहे. यासोबतच गुगल लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट अँड्रॉइड 14 (Android 14) देखील लाँच करणार आहे. Android 14 व्यतिरिक्त, Google या दिवशी Pixel 8 आणि 8 Pro देखील लाँच करेल. Google ने पिक्सेल 8 स्मार्टफोन (Smartphone) एका टीझरमध्ये (Teaser) सादर केला आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की डिव्हाइस (Device) गुलाबी रंगात येऊ शकते.


Google Pixel 8 मध्ये काय खास असेल


1. कंपनी Google Pixel  मध्ये दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.


2. प्रोसेसर - कंपनी Google च्या इन-हाउस Tensor G3 चिपसेटसह Pixel 8 series आणू शकते.


3. दोन्ही Google Pixel 8 स्मार्टफोन्सना नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम (Operating System)  Android 14 प्री-इंस्टॉल (Pre-Install) मिळण्याची अपेक्षा आहे.


4. कॅमेरा - Pixel 8 मालिका 50MP Samsung ISOCELL GN2 प्राथमिक सेन्सरसह (Sensor) आणली जाऊ शकते.


5. या तंत्रज्ञानासह (Technology) नवीन स्मार्टफोनच्या मदतीने 35% अधिक स्पष्ट आणि क्लिअर फोटो क्लिक करण्यात मदत होऊ शकते.


6. Pixel 8 Pro 64MP अल्ट्रा-वाइड सेन्सरसह (Altra-Wide Sensor) आणला जाण्याची अपेक्षा आहे. Pixel 8 फक्त 12.2MP कॅमेरासह आणला जाऊ शकतो.


7. डिस्प्ले - कंपनी 6.1-इंच OLED स्क्रीन (Screen) आणि 120Hz रिफ्रेश रेटसह (Refresh Rate) Pixel 8 आणू शकते. याशिवाय Pixel 8 Pro 6.7-इंच फ्लॅट डिस्प्ले (Flat Display) आणि 120Hz रिफ्रेश रेटसह आणला जाऊ शकतो.


8. बॅटरी - Google Pixel 8 सीरीजच्या दोन्ही फोनमध्ये 4,950mAh बॅटरी (Battery) मिळण्याची अपेक्षा आहे.


फीचर्स


- मिडीया रिपोर्टनुसार समोर आले आहे की, Google Pixel 8 चार रंग (Color) पर्याय Hazel, Obsidian, Rose आणि Mint मध्ये लाँच केला जाऊ शकतो.


- तर Pixel 8 Pro तीन रंग पर्यायांमध्ये ऑब्सिडियन, पोर्सिलेन आणि मिंट येऊ शकतो. तर Play Store वर Pixel 8 Pro चा फोटो पोर्सिलेन कलरमध्ये दिसला होता.


- रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले आहे की, पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 प्रो Google च्या नवीन Tensor G3 सह सादर केले जाऊ शकतात.


 


इतर महत्वाच्या बातम्या


WhatsApp Update : लवकरच Whatsapp वर 'इन्स्टंट व्हिडीओ मेसेज'साठी मिळणार खास ऑप्शन; 'असं' करता येईल ऑन-ऑफ