Car On Amazon : अॅमेझॉनवर आज जगभरात (Amazon) विविध उत्पादनांची विक्री केली जाते. अॅमेझॉनवरुन पुस्तक विकण्यापासून ते जगभरात विविध वस्तू विकण्यापर्यंतचा प्रवास मोठा आहे. टीव्ही, स्मार्टफोन, कपडे, फॅशन आयटम यासोबतच आता आपल्याला कारचीदेखील खरेदी करता येणार आहे. कंपनीने दक्षिण कोरियन कंपनी ह्युंडाईसोबत भागीदारी केली असून पुढील वर्षापासून ग्राहकांना अॅमेझॉनच्या माध्यमातून आपली आवडती कार ऑर्डर करता येणार आहे.


ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन आणि ह्युंडाईने सांगितले की, सध्या अॅमेझॉन यूएस स्टोअरमध्ये लोकांना ही सुविधा दिली जाणार आहे. पुढील वर्षांपासून ग्राहक ांना ह्युंडाईची वाहने ऑनलाइन ऑर्डर करता येणार आहेत. अॅमेझॉन आधीच कार अॅक्सेसरीज विक्री करते आणि "अॅमेझॉन व्हेईकल शोरूम" साइट चालवते जे उत्पादकांना जाहिरात करण्यास अनुमती देते. मात्र, आता कंपनी वाहनांची डिलिव्हरीही सुरू करणार आहे.


ह्युंदाईच्या वाहनांमध्ये मिळणार अॅलेक्सा व्हॉईस असिस्टंट


टेकक्रंचच्या वृत्तानुसार, ह्युंडाईने असेही म्हटले आहे की, ते अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) आपल्या पसंतीचे क्लाउड प्रदाता म्हणून वापरतील आणि भविष्यातील वाहनांमध्ये अलेक्सा व्हॉईस असिस्टंटची सर्विसदेखील पुरवतील. 



 सोशल मीडिया अॅप्ससोबत पार्टनरशीप...


अॅमेझॉनला आपले ऑनलाइन शॉपिंग नेट जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे आहे आणि त्यासाठी कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अलीकडेच असे सांगण्यात आले होते की, अॅमेझॉनने मेटा आणि स्नॅपचॅटसोबत पार्टनरशीप केली आहे जेणेकरून या अॅप्सच्या वापरकर्त्यांना अॅपमध्ये खरेदीचा अनुभव घेता येईल. सध्या अमेरिकेतील युजर्सना या अॅप्सवर जाहिराती दिसतील. अमेरिकेतील लोक जाहिरातीत दिसणाऱ्या वस्तू मागवू शकतील. मात्र यासाठी युजर्सला आपलं सोशल मीडिया अकाऊंट अॅमेझॉनशी लिंक करावं लागणार आहे. या अॅप्समध्ये युजर्सना प्रॉडक्टची किंमत, डिलिव्हरी स्टेटस आणि पेमेंटची माहिती पाहायला मिळणार आहे. 


जगभरात अॅमॅझॉनवर अनेक प्रकारच्या वस्तू विकायला असतात. त्यात साध्या शेणाच्या गौऱ्यांपासून ते थेट iphone पर्यंत सगळ्यात गोष्टी अॅमॅझ़ॉनवर विकायला आहे. त्यामुळे अनेक लोकांनी खरेदी आता सोपी झाली आहे. त्याचा प्रवासाचा वेळदेखील  वाचत आहे आणि सोबतच लोकांचीदेखील गडबड कमी होत आहे. त्यामुळे किमान 60 टक्के लोक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देताना दिसतात आणि त्यातही अॅमॅझॉनची निवड करताना दिसतात आता कारदेखील अॅमॅझॉनवर मिळणार असल्याने या सेवेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Apple iphone 14 Emergency SOS : आयफोनच्या 'या' मॉडेलवर भन्नाट मोफत सेवा; संकटकाळात होणार मदत, जीवही वाचवणार!