Oppo A78 5G: चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo ने जानेवारीमध्ये A सीरीज अंतर्गत Oppo A78 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये मोबाईल फोन लॉन्च केला होता, ज्याची किंमत तेव्हा 21,999 रुपये होती. आता हा 5G स्मार्टफोन Amazon वर 14% च्या सवलतीनंतर 18,999 रुपयांना विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. इतकंच नाही तर इतर ऑफर्सचाही फायदा या मोबाईल फोनवर दिला जात आहे, त्यानंतर याची किंमत खूपच कमी होते. 


Oppo A78 5G: काय आहे ऑफर?


Oppo A78 5G ची किंमत 18,999 रुपये आहे. SBI आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर मोबाईल फोनवर 1,500 रुपयांची सूट दिली जात आहे. दुसरीकडे जर तुम्ही तुमचा जुना मोबाईल फोन एक्सचेंज करून हा स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला 18,049 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असायला हवा. तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्ही फक्त 950 रुपयांमध्ये Oppo A78 5G स्मार्टफोन घरी आणू शकता.


Oppo A78 5G: स्पेसिफिकेशन 


स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या 5G फोन मध्ये तुम्हाला 33W फास्ट चार्जिंग सह 5000mah ची बॅटरी मिळते. मोबाईल फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. Oppo A78 5G 6.56-इंचाच्या स्क्रीनसह येतो. जो 90hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी मोबाईल फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 5-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला होता.


Oppo A78 5G: Infinix Hot 30I उद्या होणार लॉन्च 


Infinix उद्या बाजारात बजेट सेगमेंट स्मार्टफोन Infinix Hot 30I लॉन्च करणार आहे. ग्राहकांना मोबाईल फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज पर्याय मिळेल. स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी, 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 6.6 इंच मोठा डिस्प्ले मिळेल.


OnePlus Nord CE 3 Lite 5G 4 एप्रिल रोजी होणार लॉन्च 


चीनी स्मार्टफोन निर्माता OnePlus 4 एप्रिल रोजी बाजारात आपला परवडणारा फोन OnePlus Nord CE 3 Lite 5G लॉन्च करू शकते. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 6.7 इंच FHD प्लस डिस्प्ले, 8GB रॅम आणि 5000 mAh बॅटरी मिळू शकते.


इतर बातमी: 


Bajaj Pulsar 220F अपडेटड बाईक लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत