Poco X5 Pro 5G: Poco लवकरच X5 सीरिजचा नवीन फोन Poco X5 Pro 5G स्मार्टफोन बाजारात लॉन्च होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा मोबाईल पुढील महिन्यात 6 फेब्रुवारीला बाजारात आणला जाऊ शकतो. या 5G स्मार्टफोनची किंमत लॉन्च होण्यापूर्वीच समोर आली आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या 5G फोनमध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्याय मिळतो. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...


Poco X5 Pro 5G: किती असू शकते किंमत...


Poco X5 Pro 5G ची किंमत एका भारतीय टिपस्टरने उघड केली आहे. Poco चा नवीन फोन 21,000 ते 23,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी Poco X5 Pro 5G स्मार्टफोन तीन मॉडेल्समध्ये सादर करेल, ज्यामध्ये पहिला 6/128GB, दुसरा 8/128GB आणि तिसरा 8/256GB आहे. नुकताच हा स्मार्टफोन हार्दिक पांड्याच्या हातात दिसला होता. म्हणजेच कंपनी लवकरच हा स्मार्टफोन बाजारात आणू शकते. Poco ने गेल्या वर्षी बाजारात 14,999 रुपये किमतीत Poco X4 Pro 5G लॉन्च केला होता. अशातच हा नवीन स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.


Poco X5 Pro 5G: मोबाइल फोन स्पेसिफिकेशन


Poco X5 Pro 5G स्मार्टफोन 6.6-इंचाच्या FHD Plus OLED पॅनेलसह येईल, जो 120hz च्या रीफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मोबाइल फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यामध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा फ्रंटला देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G SoC वर काम करेल.


Poco X5 Pro 5G मध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. असं असलं तरी कंपनीने याच्या किंमत आणि इतर फीचर्सबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही. त्यामुळे याच्या किंमतीत बदल देखील होऊ शेतात. मोबाईल फोन लॉन्च झाल्यानंतरच नेमकी माहिती समोर येईल.


हे स्मार्टफोनही लवकरच होणार लॉन्च 


Poco व्यतिरिक्त लवकरच OnePlus आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 11 5G देखील बाजारात लॉन्च करणार आहे. याशिवाय Oppo A58, iQOO Neo 7, Moto S30 Pro, Vivo S16 इत्यादी सारखे अनेक स्मार्टफोन बाजारात लॉन्च होणार आहेत. बहुतेक नवीन स्मार्टफोन्स 5G ला सपोर्ट करतील आणि तुम्हाला त्यामध्ये मजबूत स्पेक्स पाहायला मिळतील. या सगळ्या व्यतिरिक्त सॅमसंग लवकरच S23 सीरीज देखील बाजारात आणणार आहे.