पोर्ट ऑफ स्पेन : जगभरातील क्रिकेटर आपापल्या स्टाईलसाठी ओळखले जातात. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारताने वेस्ट इंडिजचा दुसऱ्या वन डेत 105 धावांनी पराभव केला. पण यादरम्यान युवराज सिंहकडून मोठी चूक घडली.


हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर युवराज सिंह पाचव्या क्रमांकवर फलंदाजी करण्यासाठी आला. पण तो 10 चेंडूत 14 धावा करुन बाद झाला. मात्र जेव्हा युवराज मैदानावर उतरला तेव्हा प्रेक्षकांनी त्याची चूक पकडली आणि ती सोशल मीडियावर व्हायरल झाली.

भारतासाठी 300 वन डे खेळणारा पाचवा क्रिकेटर ठरलेला युवराज सिंह, वेस्ट इंडिज दौऱ्यावर चॅपियन्स ट्रॉफीची जर्सी परिधान करुन मैदानात उतरला. खरंतर वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाासाठी नवीन जर्सी बनली आहे.

खराब फॉर्ममुळे युवराज टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. आता या चुकीमुळे लोक युवराजला पुन्हा ट्रोल करत आहेत.

परंतु युवराजने ही जर्सी स्टाईलसाठी परिधान केली होती खरंच त्याने चुकीमुळे घातली, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. निराशाजनक कामगिरीनंतरही कर्णधार आणि निवड समितीचा युवराजवर विश्वास आहे.