मुंबई: हुआवेनं आपला नवा स्मार्टफोन ऑनर 8 प्रो लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीनं या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये लाँच केला होता. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जुलैपासून भारतात हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. याची खासियत म्हणजे 6 जीबी रॅम आणि बॅटरी 4000 mAh आहे.
ड्यूल सिम असणाऱ्या ऑनलर 8 प्रो स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे. यामध्ये 5.7 इंच स्क्रिन असून याचं रेझ्युलेशन 1440x2560 पिक्सल आहे. तर यामध्ये किरिन 960 प्रोसेसर आणि 6 जीबी रॅम आहे. तसेच यामध्ये 128 जीबी इंटरनल मेमरी असून 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
यामध्ये 4G, LTE, वाय-फाय, यूएसबी पोर्ट टाइप-सी, ब्ल्यूटूथ यासारखेही ऑप्शन देण्यात आले आहेत.