Yuvraj Singh,Hazel Keech : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि त्याची पत्नी  हेजल कीच (Hazel Keech)हे आई- बाबा झाले आहेत. मंगळवारी (25 जानेवारी) हेजलनं मुलाला जन्म दिला. युवराजनं याबद्दल ट्वीट करत ही गोड बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. 


युवराजनं ट्वीटमध्ये लिहिले, 'आम्हाला आमच्या  कुटुंबियांना, मित्र-मैत्रिणींना आणि चाहत्यांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की देवाच्या कृपेने मला आणि हेजलला   पुत्ररत्न प्राप्ती  झाली आहे. आम्ही सर्वांकडून आमच्या  खासगी आयुष्याचा सन्मान राखला जाईल, याची अपेक्षा करतो. आम्ही या आनंदी क्षणासाठी देवाचे आभार मानतो.    '


12 नोव्हेंबर 2015 मध्ये हेजल आणि युवराजचा साखरपुडा झाला. 30 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांचा विवाह सोहळा पार पडला. युवराजची पत्नी हेजल ही अभिनेत्री आहे. तिने जाहिरातींमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' या चित्रपटामध्ये हेजलनं प्रमुख भूमिका साकारली आहे.  






तसेच हेजलनं  मॅक्सिम, धर्म संकट में आणि बांके की क्रेजी बारात या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. बॉलिवूडसोबतच हेजलनं पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले. बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये देखील हेजलनं भाग घेतला होता. 


हे देखील वाचा-


Raina on Pushpa Dance: डेव्हिड वॉर्नरपाठोपाठ सुरेश रैनाही थिरकला श्रीवल्ली गाण्यावर, इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ


Pushpa Dance Viral: डेव्हिड वार्नर श्रीवल्ली गाण्यावर थिरकल्यानंतर, त्याच्या लेकी थिरकल्या सामी गाण्यावर, पाहा VIDEO


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha