मुंबई: आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे सिक्सर किंग युवराज सिंह. युवराजने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूत 62 धावा केल्या. त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

युवराजने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

या सामन्यानंतर युवराजने आपल्या संघसहकाऱ्यांसोबत डान्स करुन जल्लोष केला. युवराजने हॉटेलमध्ये डान्स केला. युवराजच्या याच जल्लोषाचा व्हिडीओ हरभजन सिंहने फेसबुकवर अपलोड केला आहे.

या व्हिडीओत युवराजच्या मागे आशिष नेहराही डान्स स्टेप करताना दिसत आहे.