चंदीगड : टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंह आणि मॉडेल-अभिनेत्री हेजल किच आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. चंदीगडपासून जवळ असलेल्या फत्तेपूर साहिबमध्ये युवराज आणि हेजल यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

लग्नसमारंभानिमित्त एका हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रमाचंही आयोजनही करण्यात आलं होतं. टीम इंडियाच्या खेळाडूंनीही युवराजच्या संगीतला हजेरी लावली होती.
तसंच युवराज सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लग्नाचं आमंत्रण दिलं आहे.

युवराज आणि हेजल यांचा विवाह हिंदू आणि शीख रितीनुसार होणार आहे. आज पंजाबी रिवाजानुसार चंदीगडमध्ये त्यांचा विवाह होईल. तर 2 डिसेंबरला गोव्यात हिंदी रितीनुसार ते बोहल्यावर चढतील.

मागील वर्षी 11 नोव्हेंबर रोजी बालीमध्ये हेजल आणि युवराजचा साखरपुडा झाला होता.