नवी दिल्ली : जिम्नास्टिक (The Gymnastics) खेळांमध्ये भारताचं नाव मोठं करु शकणारा एक राष्ट्रीय दर्जाचा जिम्नास्ट सुमित राणा (Sumit Rana) यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुमित सराव करताना मानेवर पडल्याने त्याच निधन झालं आहे. मंगळवारी (14 डिसेंबर) ही दुख:द घटना घडली जिम्नास्टिक खेळांमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेला सुमित राणाच्या (Sumit Rana Death) निधनाच्या माहितीने क्रिडा विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार सुमित जिम्नास्टिकचा सराव करत असताना मानेवर पडला, ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सुमित नौसेनेचा कर्मचारी असून सर्विसेजकडून तो राष्ट्रीय स्तरावर खेळला आहे. द ब्रिज या स्पोर्ट वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी 14 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली आहे. सुमितचा भाऊ आदित्य राणा याने याबाबतची माहिती दिली असू आदित्यानेही याआधी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 



2016 मध्ये बनला होता राष्ट्रीय चॅम्पियन


सुमित मागील काही वर्षांपासून प्रयागराजच्या राष्ट्रीय स्पोर्ट्स अकादमीत ट्रेनिंग करत होता. तो भारतीय नौसेनेचा कर्मचारी असून याआधी 2016 साली सर्विसेजकडून त्याने राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा सन्मान मिळवला होता.  


संबधित बातम्या



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live