ODI Male Cricketer of the Year : भारतीय क्रिकेट संघासाठी 2023 हे वर्ष दमदार ठरले. टीम इंडियाने तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया ते आयर्लंडपर्यंत अनेक संघांना पराभूत केले, आशिया कप जिंकला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला. या दोन स्पर्धांचे अंतिम सामने जिंकले असते तर कदाचित हे वर्ष टीम इंडियासाठी सर्वात संस्मरणीय वर्ष ठरले असते. मात्र, या संपूर्ण वर्षात टीम इंडियाला इतके यश मिळवून देण्यात ज्या खेळाडूंनी सर्वात जास्त योगदान दिले ते म्हणजे युवा खेळाडूंनी.  


गिलला ODI क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळणार?  (icc cricketer of the year 2023)


शुभमन गिलसाठी (Shubman Gill) 2023 हे आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. त्याने टीम इंडियासाठी यावर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. विशेषत: ODI फॉरमॅटमध्ये शुभमन गिलने इतकी चांगली कामगिरी केली आहे की त्याला ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर देखील घोषित केले जाऊ शकते. 


2023 हे वर्ष एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी 


फक्त एकदिवसीय फॉर्मेटबद्दल बोलायचे तर शुभम गिलने यावर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राइक रेटने एकूण 1584 धावा केल्या. या कालावधीत शुभमन गिलने 5 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच वर्षी गिलने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतकही झळकावले, जे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक आहे, त्यामुळे गिल आता भारताच्या निवडक 5 खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी द्विशतक झळकावले आहे. 


गिलचे 2023 मध्ये आश्चर्यकारक रेकॉर्ड


त्यामुळे शुभमन गिलच्या (Shubman Gill) वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्याही 208 धावांची झाली आहे. या संपूर्ण वर्षात गिलने वनडे फॉरमॅटमध्ये एकूण 41 षटकार आणि 180 चौकार मारले आहेत, तर तो केवळ एका डावात 0 धावांवर बाद झाला होता.



  • वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

  • एकदिवसीय फॉरमॅटसाठी आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर

  • एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

  • न्यूझीलंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिले द्विशतकही झळकावले.

  • 2023 एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 66 चेंडूत 80 धावांची संस्मरणीय खेळी

  • 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या एकूण 29 डावांमध्ये, गिलने एकूण 5 शतके, 9 अर्धशतके, 41 षटकार, 180 चौकार आणि एकूण 1584 धावा केल्या आहेत.

  • हे सर्व आकडे पाहता, शुभमन गिलला आयसीसीकडून यावर्षीचा एकदिवसीय क्रिकेटपटू घोषित केला जाऊ शकतो. आता येणारे नवीन वर्ष 2024 शुभमन गिलसाठी कसे ठरते हे पाहायचे आहे.


टीम इंडियाला नवा हिटमॅन, मोहम्मद शमी अन् युवराज मिळाला


दुसरीकडे, या सरत्या वर्षातील शेवटच्या दौऱ्यात निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही प्रकारच्या मालिकेसाठी 31 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यातील 17 सदस्यीय संघ T-20 साठी आणि 16-16 एकदिवसीय-कसोटीसाठी जाहीर करण्यात आले आहेत. तिन्ही संघात फक्त 3 खेळाडू आहेत. यामध्ये ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि मुकेश कुमार यांना स्थान मिळाले आहे. ऋतुराज गायकवाड, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, जे तिन्ही फॉरमॅटमध्ये आहेत. त्यांना T-20, वनडे आणि कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.


ऋतुराज गायकवाडने टीम इंडियाचे नेतृत्व करताना राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते. वर्ल्डकपला त्याला संधी मिळाली नव्हती. मायदेशात सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये त्याने पहिल्या 21 चेंडूत 21 धावा केल्यानंतर नंतरच्या 36 चेंडूत 102 धावांचा पाऊस पाडला होता. यशस्वी जैस्वालही दमदार कामगिरी करत आहे. मात्र, ऋतुराजने बाजी मारली आहे. मुकेश कुमारनेही आपल्या गोलंदाजीतून प्रतिभा दाखवली आहे. आर. अश्विनने अलीकडेच त्याची कामगिरी पाहून भारताला नवा मोहम्मद शमी मिळाल्याची प्रतिक्रिया दिली होती. श्रेयस अय्यरने वर्ल्डकपमध्येच टीकेतून सावरत चौथ्या क्रमांकावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे मधल्या फळीत 'युवराज' मिळाला आहे. रिंकू सिंहने सुद्धा आपली छाप सोडत फिनिशर म्हणून नाव कमावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरत्या वर्षात तो सुद्धा टीम इंडियासाठी लकी ठरला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या