WTC Match : ॲडलेडमधील डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखत टीम इंडियाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सर्व 10 गडी राखून हा विजय मिळवला आहे. या विजयाने ऑस्ट्रियाला 1-1 अशी बढती मिळाली आहे. दरम्यान, हा सामना भारताचा सिराज आणि ऑस्ट्रेलियाच ट्रॅव्हिस हेड (Siraj Mohammed And Travis Head) यांच्यातील वादामुळे चांगालच चर्चेत आला. सामना चालू असताना या दोघांनीही एकमेकांवर संताप व्यक्त केला. दरम्यान, आता हीच जोडी पुन्हा एकदा समोरासमोर आली आहे. दोघांनही एकमेकांशी काहीतरी चर्चा केली आहे. त्यानंतर या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी? हा प्रश्न सगळीकडे विचारला जात आहे.
सिराज-हेड पुन्हा एकदा आमनेसामने?
आज दुसरा कसोटी सामना चालू असताना सिराज मोहम्मद फलंदाजी करण्यासाठी आला होता. दुसरीकडे हेड हा क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी सिराज आणि हेड समोरासमोर आले. त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी संवाद झाला. हा संवाद रागात किंवा संतापाच्या सुरात नव्हता. दोघेही शांतपणे एकमेकांना बोलत होते. दोघांमध्ये अवघ्या 10 सेकंदांचा संवाद झाला. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून दोघांमध्येही समेट घडून आल्याचं बोललं जातंय. दोघांनीही तो वाद फार मनाला लावून घेऊ नये, असा त्यांच्यात संवाद झाला असावा, असा अंदाज लावला जातोय.
चल निघ असा इशारा केला
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामना चांगलाच वादळी ठरला. हा सामना अॅडेलेड मैदानावर पार पडला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाच तुफानी फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्यात चांगलाच वाद झाला. सिराजने फेकलेल्या वेगवाने चेंडूवर ट्रॅव्हिस बाद झाला. बाद होताच सिराजने आक्रमक होऊन आनंद साजरा केला. त्यानंतर पुढच्याच क्षणाला सिराज आणि हेड यांच्यात वाद झाला. सिराजने डोळे वटारून सिराजकडे पाहिले. तसेच हातवारे करून चल निघ असा इशारा केला. त्याच्या या इशाऱ्यानंतर ट्रॅव्हिस हेडनेही त्याला प्रत्युत्तर दिले. या सर्व प्रसंगाची सगळीकडेच चर्चा होत होती.
दोघांमध्ये पुन्हा 10 सेकंदांचा संवाद
विशेष म्हणजे क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मैदानावर जे काही घडलं ते खेळभावनेला धरून नाही, असं मत अनेकांनी मांडलं. तर भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी सिराजला पाठिंबा दिला.
हेडच्या तुफान फलंदाजीमुळे टीम इंडिया अडचणीत
दरम्यान, हेडने या सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली. त्याने तब्बल 140 धावा केल्या. त्याच्या एकट्याच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया चांगल्याच मजबूत स्थितीत जाऊ पोहोचला. परिणामी भारतापुढे मोठं आव्हान उभं राहिलं.
हेही वाचा :