स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात होणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच कुस्ती होती. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो कुस्तीशौकिनांनी ही कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती.
मनजीतसिंग हा किरण भगतपेक्षा वजनानं आणि उंचीनंही भारी होता. त्यामुळं या कुस्तीवर तो वर्चस्व गाजवेल, असा अंदाज होता. पण किरण भगतनं चपळाईनं डाव टाकत आधी मनजीतसिंगवर कब्जा मिळवला आणि मग त्यालाही चीतपटही केलं.
या ऐतिहासिक कुस्तीमध्ये किरण भगतने मनजीतसिंगला आस्मान दाखवलं. लोखंडी पिंजऱ्यातील या कुस्तीमध्ये किरणने अवघ्या काही मिनिटात मनजितसिंगवर मात केली.
ही पोलादी कुस्ती जिंकणाऱ्या किरण भगतनं तब्बल 4 लाखांचं बक्षीस पटकावलं आहे. तर उपविजेत्या मनजितसिंगला देखील 1 लाखाचं बक्षीस देण्यात आलं.
या कुस्तीला पाहुणे म्हणून भिडे गुरुजीही उपस्थित होते. त्याचप्रमाणे तुझ्यात जीव रंगला... फेम राणा दा (हार्दिक जोशीने) देखील हजेरी लावली होती.
VIDEO :
संबंधित बातम्या :
लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती, आज किरण भगत आणि मनजीतसिंग भिडणार