पोर्ट ऑफ स्पेन: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाने तीनशे धावांचा टप्पा पार करुन एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताने विंडिजविरुद्ध 5 बाद 310 धावा केल्या.

भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीनशेपेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम तब्बल 96 वेळा केला आहे. या विक्रमासह भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे.

ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी 95 वेळा केली आहे.

भारताने आतापर्यंत 903 सामन्यात 96 व्यांदा 300 पेक्षा जास्त धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने 891 सामन्यात 95 वेळा अशी कामगिरी केली आहे.

असं असलं तरी भारताने गेल्या 622 सामन्यातच सर्वाधिक 300 पेक्षा जास्त धावा उभारल्या आहेत. त्यापूर्वीच्या सामन्यात हा आकडा गाठण्याचं प्रमाण कमी होतं.

महत्त्वाचं म्हणजे भारताने पहिलं त्रिशतक 1996 मध्ये झळकावलं होतं. अन्य संघाच्या तुलनेत भारताने तीनशेचा आकडा गाठण्यास खूपच उशीर केला होता. मात्र तरीही अन्य संघापेक्षा सर्वात सुपरफास्ट 300 पेक्षा जास्त धावा करणारा संघही भारतच ठरला आहे.

वन डेमध्ये सर्वाधिक 300 पेक्षा धावा करणारे संघ

  •  भारत - 96

  • ऑस्ट्रेलिया - 95

  • द. आफ्रिका - 77

  • पाकिस्तान - 69

  • श्रीलंका - 63

  • इंग्लंड - 57

  • न्यूझीलंड - 51


 पहिल्यांदा 300 पेक्षा जास्त धावा करणारे संघ

  • 1975 - इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान

  • 1978 - वेस्ट इंडिज

  • 1992 - झिम्बाब्वे, श्रीलंका

  • 1994 - दक्षिण आफ्रिका

  • 1996 - भारत


21 वर्षातील भारताचे रेकॉर्ड

भारताने पहिल्यांदा 15 मार्च 1996 रोजी शारजाह इथं 300 ही धावसंख्या गाठली होती. ऑस्ट्रेलियाशी तुलना करायचं झाल्यास, त्यांनी हा आकडा 1975 मध्येच गाठला होता.

1996 नंतर आतापर्यंत 21 वर्षात भारताने 96 वेळा 300+ धावसंख्या केली. तर इतक्या वर्षात ऑस्ट्रेलियाने 88 वेळा अशी कामगिरी केली.

भारताने परदेशात 53 वेळा, तर भारतात 43 वेळा 300+ धावा केल्या आहेत. 

1996 नंतर कोणाच्या किती 300+ धावा?

  • भारत - 96

  • ऑस्ट्रेलिया -88

  • द. आफ्रिका - 72

  • पाकिस्तान-62

  • श्रीलंका -59

  • इंग्लंड - 50

  • न्यूझीलंड -46

  • वेस्ट इंडिज - 29