IND vs NED, Sydeney Weather Report : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) आज पुन्हा एकदा टीम इंडिया मैदानात उतरणार असून त्यांच्यासमोर नेदरलँड्सचं (IND vs NED) आव्हान असणार आहे. दरम्यान या सामन्यावेळी पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान सामन्यावेळी पावसाचा व्यत्यय आल्यास सामन्याच्या ओव्हर्स कमी केल्या जाऊ शकतात, तसंच अधिक पाऊस असल्यास सामना रद्दही केला जाऊ शकतो. त्यात बुधवारी झालेल्या आयर्लंड विरुद्ध इंग्लंड सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार रिझल्ट काढला गेला, तसंस करण्याची शक्यता देखील आहे. पण या सर्वाहून पाऊस नाहीच आला तर अधिक चांगलं होईल...जेणेकरुन क्रिकेट रसिकांना संपूर्ण सामना पाहता येईल.
क्रिकबरवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हवामान खात्याने सांगितले आहे की भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यापूर्वी पाऊस पडू शकतो. सध्या सिडनीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय वेळेनुसार सकाळी 7.30 च्या सुमारास पाऊस पडला. त्यामुळे नाणेफेकीपूर्वी किंवा नंतर पाऊस पडण्याची शक्यता नक्कीच आहे. ज्यामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो.
पावसाने सामना रद्द झाल्यास काय?
टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
नेदरलँड्सचा संघ
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ विकेटकिपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओडॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, टिम व्हॅन डर गुगटेन , स्टीफन मायबर्ग, तेजा निदामनुरु, ब्रॅंडन ग्लोव्हर.
हे देखील वाचा-