IND vs NED, T20 World cup 2022 : आज भारत आणि नेदरलँड (Ind vs Ned) दोन्ही संघ टी20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 12 फेरीचा सामना खेळणार आहेत. भारताने सलामीचा सामना पाकिस्तानविरुद्ध जिंकत गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. ज्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत आणखी आघाडी घेऊन सेमीफायनलमध्ये भारताचं पोहोचणं आणखी सोपं होईल. पण भारत-नेदरलँड सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारताचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं अवघड होणार का हा प्रश्न क्रिकेट प्रेमींसमोर आहे. याचच उत्तर जाणून घेऊ...

तर भारत आणि नेदरलँड सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार असून त्याठिकाणी जवळपास 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता Weather.com ने दिली आहे. दरम्यान टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील. ज्यानंतर भारताच्या खात्यावर 3 गुण होतील. मग भारताला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकावा लागेल, ज्यानंतरच भारत आपली आघाडी कायम ठेवेल,त्यात पाकिस्तान संघही चांगल्या फॉर्मात असल्याने त्यांनी भारतानंतर उर्वरीत संघावर विजय मिळवल्यास आजच्या अनिर्णीत सामन्यामुळे भारताला एक गुण कमीच राहिल आणि पाकिस्तान पुढे जाऊ शकतो. या सर्वामध्ये पुढे जाऊन नेट रनरेटही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यात नेदरलँडचा संघ खास फॉर्मात नसल्याने भारताच्या विजयाच्या अपेक्षा आज अधिक आहेत, त्यामुळे पावसाने व्यत्यय आणता कामा नये, अशी प्रार्थना भारतीय क्रिकेटप्रेमी करत आहेत.

कसा आहे ग्रुप 2 चा पॉईंट टेबल?

POS TEAM PLD WIN LOST TIED N/R NET RR PTS
1 बांग्लादेश 1 1 0 0 0 +0.450 2  
2 भारत 1 1 0 0 0 +0.050 2  
3 दक्षिण आफ्रीका 1 0 0 0 1 - 1  
4 झिम्बाब्वे 1 0 0 0 1 - 1  
5 पाकिस्तान 1 0 1 0 0 -0.050 0  
6 नेदरलँड 1 0 1 0 0 -0.450 0  
 

हे देखील वाचा-