कोलंबो : टी  20 वर्ल्ड कपमध्ये आज ऑस्ट्रेलियाला झिम्बॉब्वे विरुद्ध  23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये 2007 मध्ये देखील झिम्बॉब्वेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये झालेल्या पराभवाननंतर कॅप्टन ट्रेविस हेडनं सामन्यात कुठं चुकलं ते सांगितलं आहे.  झिम्बॉब्वेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 2  बाद  169  धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 19.3 ओव्हरमध्ये 146  धावांवर बाद झाला.  

Continues below advertisement

Travis Head : ट्रेविस हेड पराभवावर काय म्हणाला?

झिम्बॉब्वेनं ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर केला. या पराभवाबद्दल बोलताना कर्णधार ट्रेविस हेड म्हणाला की हा पराभव निराशाजनक आहे. मात्र, 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये देखील अशाच प्रकारची स्थिती होती. दुखपतीमुळं जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स स्पर्धेबाहेर आहेत. राहिलेल्या दोन सामन्यांसाठी ट्रेविस हेडनं संघावर विश्वास दर्शवला आणि आमच्या ब्ल्यूप्रिंटनुसार खेळणार असल्याचं ट्रेविस हेडनं म्हटलं. 

 मिशेल मार्श दुखापतग्रस्त झाल्यानं ट्रेविस हेड सध्या ऑस्ट्रेलियाचं नेतृत्त्व करत आहेत. ऑस्ट्रेलियाचं नेमकं काय चुकलं हे सांगताना ट्रेविस हेडनं झिम्बॉब्वेचं कौतुक देखील केलं. झिम्बॉब्वेचा संघ चांगला खेळल्याचं देखील हेडनं म्टलं.  

Continues below advertisement

पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना ट्रेविस हेडनं म्हटलं की, मला वाटतं आम्ही बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. आम्ही फक्त 2 विकेट घेऊ शकलो. मात्र, आम्ही दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली पण विकेट गमावल्या. पहिल्या हाफमध्ये दबावात होतो, असंही हेड म्हणाला. 

ट्रेविस हेड म्हणाला की, इथली विकेट चांगली होती, आम्ही आमच्यावर दबाव वाढवला. पॉवरप्लेमध्ये विकेट गमावल्या आणि त्यामुळं आणखी दबाव वाढला. यामुळं स्कोअर बोर्डचा रेट आणखी वाढला. आम्ही मधल्या फळीत भागिदारी करु शकलो असतो, मात्र आम्ही विकेट गमावल्या आणि पराभव झाला, असं हेडनं म्हटलं. 

झिम्बॉब्वेनं दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं आहे. 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. आजच्या झिम्बॉब्वेच्या विजयानं ब गटातील गणित बदललं आहे. ऑस्ट्रेलिया ब गटात तिसऱ्य स्थानावर पोहोचला आहे. तर, झिम्बॉब्वे 4 गुणासंह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाला सुपर  8 मध्ये जायचं असल्यास मोठ्या फरकानं राहिलेले सामने जिंकावे लागतील. दुसरीकडे या गटात झिम्बॉब्वेचा सामना आयरलँड विरुद्ध मंगळवारी होणार आहे तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सोमवारी सामना होणार आहे.