T20 WC 2022, Semifinals Scenario : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारताला रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला 5 विकेट्सच्या फरकाने सामना गमवावा लागला. दरम्यान या पराभवामुळे भारताचं गुणतालिकेत पहिलं स्थानही गेलं असून आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ज्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून आरामात सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण या सर्वामध्ये पावसाने व्यत्यय आणल्यास मात्र टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात...
तर भारत असणाऱ्या ग्रुप 2 मध्ये प्रत्येक संघाने आपले 3 सामने खेळले असून प्रत्येक संघाला आणखी 2 सामने खेळायचे आहेत. भारताचे सुपर-12 फेरीतील शेवटचे दोन सामने बांग्लादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचे आहेत. यावेळी भारतीय संघ बांग्लादेशकडून हरला तर त्यांना जास्तीत जास्त झिम्बाब्वेला नमवून 6 गुण मिळवण्याचीच संधी आहे. पण बांग्लादेशने भारतानंतर पाकिस्तानलाही मात दिल्यास ते 8 गुणांसह भारताला मागे टाकून सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवतील. दुसरीकडे पाकिस्तानचा विचार करता त्यांनी पाकिस्तानने आता त्यांचे उर्वरीत दोन्ही सामने बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकल्यास भारत आणि त्यांच्यात नेट-रनरेटचं गणित असेल. त्यामुळे भारत बांग्लादेशकडून बुधवारी पराभूत झाल्यास बांग्लादेश आणि पाकिस्तान या दोघांचे सेमीफायनलमध्ये एन्ट्रीचे चान्सेस वाढतील. सध्या विचारत करता सर्वाधिक 5 गुणांसह दक्षिण आफ्रिका सेमीफायनलच्या शर्यतीत अव्वल आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध भारत पराभूत झाल्यास?
भारताने बांग्लादेशविरुद्ध सामना जिंकला आणि झिम्बाब्वेविरुद्ध सामना गमावल्यास झिम्बाब्वे संघाचे दक्षिण आफ्रिका संघासोबत सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे चान्सेस वाढतील. यासाठी झिम्बाब्वेला नेदरलँड संघाला मात द्यावी लागेल. सध्या झिम्बाब्वेचा फॉर्म पाहता ते नेदरलँडला नक्कीच मात देऊ शकतात. असे झाल्यास 7 गुणांसह ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील.
पाऊस होऊ शकतो व्हिलेन
ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक सुरु असून आतापर्यंत बऱ्याच सामन्यात पावसाने व्यत्यय घातला आहे. दरम्यान आता टीम इंडियाच्या उर्वरीत दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि सामने रद्द झाले तर भारताला प्रत्येकी 1-1 गुण देऊन त्यांच्या खात्यावर 6 गुणच होणार आहेत. ज्यामुळे भारतापेक्षा इतर संघाचे सेमीफायनलमध्ये एन्ट्रीचे चान्सेस वाढतील.
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णीत | गुण | नेट रनरेट |
1 | दक्षिण आफ्रिका | 3 | 2 | 0 | 1 | 5 | 2.772 |
2 | भारत | 3 | 2 | 1 | 0 | 4 | 0.844 |
3 | बांग्लादेश | 3 | 2 | 1 | 0 | 4 | -1.533 |
4 | झिम्बाब्वे | 3 | 1 | 1 | 1 | 3 | -0.050 |
5 | पाकिस्तान | 3 | 1 | 2 | 0 | 2 | 0.765 |
6 | नेदरलँड्स | 3 | 0 | 3 | 0 | 0 | -1.948 |
हे देखील वाचा-