T20 World Cup 2022 : नामिबिया या नवख्या संघाने टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये पहिला सामना श्रीलंकेसारख्या दिग्गज संघाविरुद्ध जिंकला ज्यानंतर ते सुपर 12 मध्ये पोहोचतील असं जवळपास निश्चित वाटत होतं, पण आधी नेदरलँड आणि आता युएई संघाकडून थोडक्यात पराभूत झाल्यामुळे त्याचं विश्वचषकातील सुपर 12 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न तुटलं आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात आधी फलंदाजी करत युएईने 148 धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना नामिबियाचा संघ 20 ओव्हरमध्ये 141 रन करु शकला आणि 7 धावांनी त्यांचा पराभव झाला.


स्पर्धेचे सुपर 12 साठीचे क्वॉलीफायर सामने आता संपत आले असून ग्रुप ए मधून आधी श्रीलंका आणि नामिबिया दुसरा सामना पराभूत झाल्यानंतर नेदरलँडचा संघ सुपर 12 मध्ये पोहोचला आहे. दोघांनी 3 पैकी 2 सामने जिंकत पुढील फेरी गाठली आहे. दरम्यान नामबियाने पहिला सामना जिंकला होता, त्यामुळे आजचा युएईविरुद्धचा सामना जिंकल्यास ते नेट रनरेटच्या जोरावर नेदरलँडला मागे टाकून सुपर 12 मध्ये पोहचू शकले असते. पण अखेरच्या षटकात डाव नामिबियाच्या हातातून निसटला आणि त्याचं सुपर 12 चं स्वप्नही भंगलं.






सामन्यात सर्वात आधी युएई संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. ज्यानंतर त्यांचा सलामीवीर मुहम्मद वसिमने 41 चेंडूत 50 धावांची दमदार केळी केली. अरविंदनं 21 रन केले तर कर्णधार रिझवानने 43 धावांची खेळी केली. बसिम अहमदनेही 25 धावाचं योगदान दिलं ज्यामुळे युएईने 149 धावांचं लक्ष्य नामिबियासमोर ठेवलं. 149 धावा करुन सामन्यात विजयासह सुपर 12 मध्ये एन्ट्रीसाठी सज्ज नामबियाचा संघ सुरुवातीपासून खराब खेळी करताना दिसला. एका मागे एक फलंदाज तंबूत परतत होते. 10 ओव्हरमध्ये त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला, त्यानंतर डेव्हिड विस्से याने 55 धावांची एकहाती झुंज दिली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही, अखेरच्या षटकात तो बाद झाला. युएईकडून मुहम्मद वसिमने गोलंदाजीतही चमक दाखवत शेवटच्या ओव्हरमध्ये 6 रन देत एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली आणि युएईला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे वसिमला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. 


हे देखील वाचा-


Ravindra Jadeja : टीम इंडियासाठी खुशखबर! रवींद्र जाडेजा दुखापतीतून सावरतोय, पाहा सराव सुरु केल्याचा VIDEO