Babar Azam's Stunning Catch:  पर्थ स्डेडियमवर (Perth Stadium) झिम्ब्बावे आणि पाकिस्तान (Pakistan vs Zimbabwe) यांच्यात टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील 12वा सामना खेळला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेला पाकिस्तानच्या संघानं अवघ्या 130 धावांवर रोखलं. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं घेतलेल्या अफलातून झेलची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय. 


झिम्बाब्वेच्या डावातील चौदाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शादाब खाननं रेगीस चकाब्वा झेल बाद केलं. रेगीस चकाब्वाला मैदाना बाहेरचा रस्ता दाखवण्यात बाबर आझमनं महत्वाची भूमिका बजावली. त्यानं अशक्य वाटत असलेला झेल पकडून पाकिस्तानच्या संघाला पाचवं यश मिळवून दिलं. 


व्हिडिओ- 






 


झिम्बाब्वेचं पाकिस्तानसमोर 131 धावांचं आव्हान
या सामन्यात नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. झिम्बाब्वेकडून सेन विल्यम्सनं सर्वाधिक 31 धावांची खेळी केली.पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनिअर उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं या सामन्यातील चार षटकात 24 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर शादाब खाननं तीन विकेट्स घेतल्या. तर,हारिफ रौफच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली. 


ट्वीट-






 


झिम्बाब्वेचा अवघ्या धावेनं विजय
दरम्यान, 131 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले. बाबर आझम आणि रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्वतःला सावरू शकला नाही. अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवामुळं पाकिस्तानची टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता वाढलीय.


हे देखील वाचा-