T20 World Cup 2022 Match Live Streaming : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धा सुरु झाली असून सध्या सुपर 12 फेरीतील सामने सुरु आहेत. दरम्यान यजमान संघ ऑस्ट्रेलियाने (Team Australia) यंदा खास कामगिरी केली नसल्याचं दिसून येत आहे. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंड संघानं त्यांना 89 धावांनी तगडी मात दिली. ज्यानंतर त्यांनी  श्रीलंकेविरुद्ध 7 विकेट्सनं विजय मिळवला. पण त्यांचा नेट रनरेट अत्यंत कमी असून ते ग्रुप 1 मध्ये सहाव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे आणखी एक बलाढ्य संघ इंग्लंड दोन पैकी एक सामना जिंकला असून एक सामना गमावला आहे. त्यानंतर आज हे दोन्ही संघ आमने-सामने असून दोघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण दोघांपैकी पराभूत संघाचं सेमीफायनलमध्ये पोहचणं फार अवघड होईल. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे 1.30 वाजता सुरु होणारा सामना वेळेवर सुरु झाला नाही.






पावसाने सामना रद्द झाल्यास काय?


टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना  गुण वाटून दिले जातील.


कधी होणार होता सामना?


ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड हा टी20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील सामना आज अर्थात 28 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होणार होता. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार होती.


कुठे होणार सामना?


आजचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघातील सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


हे देखील वाचा-