Calum MacLeod Retirement: स्कॉटलँडचा तडाखेबाज फलंदाज कॅलम मॅक्लिओडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. मॅक्लिओडनं 2007 मध्ये स्कॉटलँडसाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2022) स्कॉटलँडच्या संघाचा तो सदस्य होता. दरम्यान, निवृत्ती जाहीर करताना मॅक्लिओड म्हणाला की, 1999 च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड यांच्यातील सामना पाहिल्यानंतर मला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना मॅक्लिओड म्हणाला की, “या विश्वचषकानंतर निवृत्त होणे कठीण आहे.  कारण आम्ही जे यश मिळवण्यासाठी आलो होतो, ते आम्हाला मिळालेलं नाही. योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास हा संघ खूप पुढं जाईल आणि अनेकांना प्रेरणा देईल अशी इच्छा मनात ठेवून मी संघाची साथ सोडत आहे.  मला माझ्या देशाकडून 229 सामने खेळण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो. मला वाटते की, मी खेळायला सुरुवात केली तेव्हापासून संघ खूप चांगल्या स्थितीत आहे.”


ट्वीट-






 


मॅक्लिओडची अवस्मरणीय खेळी
पाच विश्वचषक खेळलेल्या मॅक्लिओडनं 2018 मध्ये आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 140 धावांची झंझावती खेळी केली होती. मॅक्लिओडच्या या वादळी खेळीच्या जोरावर स्कॉटलँडच्या संघानं इंग्लंडसमोर 372 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं होतं. या रोमहर्षक सामन्यात स्कॉटलंडच्या स्कॉटलँडच्या संघानं इंग्लंडचा चार धावांनी धुव्वा उडवला. मॅक्लिओडने 87 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 हजार 24 धावा केल्या आहेत, ज्यात 10 शतकं आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यानं 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1 हजार 239 धावा केल्या आहेत.


टी-20 विश्वचषकात स्कॉटलँडची निराशाजनक कामगिरी
यंदाच्या टी-20 विश्वचषकात स्कॉटलँडच्या संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील तीन पैकी दोन सामन्यात स्कॉटलँडच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. ज्यामुळं पात्रता फेरीतच स्कॉटलँडच्या संघाला आपलं सामान गुंडळावं लागलं. 


हे देखील वाचा-