India vs South Africa : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cp 2022) आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात रंगतदार सामना पार पडला. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारतीय गोलंदाजांनी अखेरपर्यंत चांगली झुंज दिली. पण फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारत केवळ 133 धावाच करु शकला होता. ज्या डिफेन्ड करण्यात गोलंदाज अपयशी ठरले आणि भारताने सामना 5 विकेट्स गमावला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्यामुळे ते ग्रुप 2 च्या गुणतालिकेत थेट अव्वलस्थानी पोहोचले आहेत.

सामना होण्यापूर्वी भारताने 2 पैकी 2 सामने जिंकत पहिलं स्थान मिळवलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेचा एक सामना जिंकून एक सामना अनिर्णीत असल्यानं ते दुसऱ्या स्थानावर होते. पण आता विजयामुळे ते 5 गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचले आहेत. तर भारत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांग्लादेशच्या खात्यावरही 4 गुण असले तरी भारताला नेट रनरेट चांगला असल्याने ते तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि नेदरलँड हे संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. 

असा आहे सुपर 12 चा ग्रुप 2

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णीत गुण नेट रनरेट
1 दक्षिण आफ्रिका 3 2 0 1 5 2.772
2 भारत 3 2 1 0 4 0.844
3 बांग्लादेश 3 2 1 0 4 -1.533
4 झिम्बाब्वे 3 1 1 1 3 -0.050
5 पाकिस्तान  3 1 2 0 2 0.765
6 नेदरलँड्स 3 0 3 0 0 -1.948