KL Rahul in T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली असली तरी आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa)  भारताची फलंदाजी फेल झाल्याचं दिसून आलं. सूर्यकुमार यादव (68) सोडता इतर फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) पहिल्या दोन सामन्याप्रमाणे आजही खराब कामगिरी करताना दिसून आला. पर्थमध्ये खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात राहुलने 14 चेंडूत केवळ 9 धावाच केल्या. ज्यामुळे यंदाच्या विश्वचषकातील त्याची खराब कामगिरी कायम राहिली.


केएल राहुल टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये फ्लॉप ठरत आहे. स्पर्धेत त्याने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने केवळ 22 धावाच केल्या आहेत. सलामीवीर म्हणून येऊनही त्याने इतक्या कमी धावा केल्यामुळे त्याच्यावर बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याला 8 चेंडूत केवळ 4 धावा करता आल्या होत्या. यानंतर, नेदरलँडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलने 12 चेंडूत केवळ 9 धावाच केल्या. आजही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट शांतच राहिली. या सामन्यात तो 14 चेंडूत अवघ्या 9 धावा करून तंबूत परतला. राहुलचा खराब फॉर्म भारतीय संघाची चिंता वाढवत आहे. केएल राहुलला चांगली कामगिरी करता न आल्याने संघाची टॉप ऑर्डर कमकुवत होत आहे. राहुलचा खराब फॉर्म टी-20 विश्वचषकातील आगामी सामन्यांमध्ये संघासाठी अडचणीचा ठरू शकतो. आता या स्पर्धेत होणाऱ्या उर्वरित सामन्यांमध्ये राहुलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.


केएल राहुलची टी20 कारकिर्द


केएल राहुल भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे त्यामुळे तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. पण त्याच्या टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 68 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 64 डावांमध्ये राहुलने 38.39 च्या सरासरीने आणि 139.42 च्या स्ट्राईक रेटने एकूण 2150 धावा केल्या आहेत. त्याचवेळी 110* धावा हा त्याचा उच्चांक ठरला आहे.


हे देखील वाचा-


IND vs SA T20 WC : सूर्यकुमारची एकहाती झुंज, अर्धशतक झळकावत सावरला भारताचा डाव, दक्षिण आफ्रिकेसमोर 134 धावांचं आव्हान