World Cup 2023 : विश्चचषकात अफगाणिस्तानने विश्वविजेच्या इंग्लंडला धूळ चारत नवा पराक्रम गाजवला. 15 व्या सामन्यात अफगाणिस्तानने पहिला सामना जिंकला आणि तोही विश्वविजेत्या इंग्लंड विरोधातील. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडने नांगी टाकली. अफगाणिस्तानी खेळाडू रहमनुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz on Virat Kohli) यानं इंग्लंड विरोधातील विजयाचं श्रेय विराट कोहली (Virat Kohli) ला दिलं आहे. विराट कोहलीनं इंग्लंड विरोधात विजयाचा प्लॅन सांगितल्याचंही त्यानं म्हटलं आहे.


अफगाण विजयात कोहलीचाही हात


दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या सामन्यात रविवारी अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला. अफगाणिस्तानसाठी सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाजनं 57 चेंडूत 80 धावांची दमदार खेळी केली. त्याने चार षटकार आणि आठ चौकार ठोकले. त्याच्या खेळीमुळे अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. यामुळे संघाला विजय मिळवला आला. सामन्यानंतर अफगाणिस्तान रहमनुल्लाह गुरबाजनं कबूल केलं की, इंग्लंड विरुद्धच्या विजयामध्ये विराट कोहलीही हात आहे. रहमनुल्लाह गुरबाजनं म्हटलं की. विराट कोहली एक 'प्रेरणा' आहे.


विजयाचं श्रेय 'किंग' कोहलीला






गुरबाजनं सांगितला इंग्लंडवरील विजयाचं गुपित


सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना रहमनुल्लाह गुरबाजनं म्हटलं की, ''कोहली हा जगातील प्रत्येक तरुण खेळाडूसाठी प्रेरणास्थान आहे. अनेक खेळाडू त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहतात आणि त्याने मला खेळाची योजना, डाव कसा बनवायचा आणि मोठ्या धावा कशा करायच्या याबद्दल मार्गदर्शन करत खूप मदत केली आहे." स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुरबाजनं विराट कोहलीचं कौतुक केलं आहे.






अफगाणिस्तानचा इंग्लंडवर विजय


अफगाणिस्ताने 285 धावांचे आव्हान दिलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडला 210 धावांमध्ये गुंडाळत 69 धावांनी विजय मिळवला. तब्बल 15 व्या सामन्यात अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. 


महत्वाच्या इतर बातम्या :


IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल, कोहलीसह इतर खेळाडूंना पाहण्यासाठी विमानतळावर गर्दी