Pakistan Team Jersey Launch : ऑस्ट्रेलियामध्ये आगामी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup) पार पडणार आहे. 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून यातील 13 देशांनी आपले संघही जाहीर केले आहेत. या संघातील अनेकांनी आपली नवी-कोरी जर्सीही स्पर्धेसाठी लॉन्च केली आहे. रविवारी (18 सप्टेंबर) टीम इंडियाने आपली जर्सी लॉन्च केल्यानंतर आता लगेचच आज (19 सप्टेंबर) पाकिस्तान संघाची विश्वचषकासाठीची जर्सी समोर आली आहे. पीसीएलमधील संघ इस्लामाद युनायटेडच्या ट्वीटर हँडलवरही या जर्सीचे फोटो असून जर्सी समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या जर्सीचे फोटो शेअर केले आहेत.

  


बाबर, नसीम आणि शादाबसह महिला खेळाडूही फोटोत


पाकिस्तान टीमने जर्सी लॉन्च केल्यानंतर खेळाडूं नवी जर्सी घातलेले फोटोही शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये कर्णधार बाबर आझम तसंच युवा गोलंदाज नसीम शाह, अष्टपैलू शादाब खान यांच्यासह महिला खेळाडूही दिसत आहेत. पाकिस्तान संघ हीच जर्सी घालून स्पर्धेत उतरणार असून पहिला सामना भारताविरुद्ध असणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 26 ऑक्टोबररोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मैदानात खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या बहुप्रतिक्षित सामन्याची सर्व तिकिटं आधीच विकिली गेली आहेत. 






टीम इंडियानंही लॉन्च केली नवी जर्सी


भारतीय संघाने रविवारी मुंबईतील एका कार्यक्रमात जर्सी लाँच करण्यात आली आहे. जर्सी लॉन्च होताच जर्सीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये कर्णधार रोहित शर्मा पोज देताना दिसत आहे. दरम्यान, विश्वचषकाआधी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधात तीन तीन सामन्याची टी 20 मालिका खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये टीम इंडिया मिशन वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. विश्वचषकासाठी लाँच करण्यात आलेल्या जर्सीवर तीन स्टार आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत तीन विश्वचषक जिंकले आहेत. त्यामुळे जर्सीवर तीन स्टार आहेत. भारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2007 मध्ये आणि 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय विश्वचषक उंचावला आहे. त्यामुळे भारताच्या जर्सीवर तीन स्टार आहेत. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघ उतरणार आहे.  


हे देखील वाचा-