India vs South africa : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cp 2022) सेमीफायनलमध्ये एन्ट्रीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सुरु आहे. पण याच महत्त्वाच्या सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली असून अवघ्या 133 धावांवर भारताचा डाव आटोपला आहे. भारताकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने केवळ 68 धावा करत एकहाती झुंज दिली, त्याशिवाय इतर खेळाडू खास कामगिरी करु न शकल्याने भारत केवळ 134 धावांचं आव्हानच दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं आहे. 


सामन्यात सर्वात आधी भारतानं नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पण भारताची सुरुवातच खराब झाली सलामीवीरापासून निम्मा संघ 50 धावा होण्याच्या आतच तंबूत परतला. यावेळी सर्वात आधी रोहित शर्मा 15 धावांवर मग राहुल 9 धावांवर त्यानंतर विराट कोहली 12 रन करुन आणि मग हुडा शून्य तर हार्दिक पांड्या 2 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर सूर्युकमार आणि दिनेश कार्तिक यांनी भारताचा डाव सावरला. सूर्या फटकेबाजी करत होता तर दिनेश केवळ त्याला साथ देत होता. पण अखेर कार्तिक 6 रन करुन बाद झाला. ज्यानंतर आश्विन, भुवनेश्वर, शमी अशा साऱ्यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला पण ते खास कामगिरी करु शकले नाही. सूर्यकुमारही 40 चेंडूत 68 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर मात्र भारत केवळ 133 धावांपर्यंत मजल मारु शकला. ज्यामुळे आता दक्षिण आफ्रिकसमोर 134 धावांचे आव्हान आहे.


सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं


भारत आणि दक्षिण आफ्रिका हा ग्रुप 2 मधील अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. कारण दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे आज सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत आघाडी घेईल आणि सेमीफायनलमध्ये पोहोचणंही संबधित संघाचं सोपं होईल. त्यामुळे आता 134 धावाचं माफक आव्हान भारत डिफेन्ड करु शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.


हे देखील वाचा-


Watch : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी हरभजनच्या चेंडूवर कतरिनाने ठोकला जोरदार शॉट, पाहा VIDEO