IND vs NZ, World Cup 2023 : टीम इंडिया (Team India) चा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने एकदिवसीय विश्वचषकात (ODI World Cup 2023) पदार्पण केलं आहे. 11 ऑक्टोबर 2023 रोजी धर्मशालाच्या (Dhramshala) हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सूर्यकुमार यादवने भारतासाठी एकदिवसीय विश्वचषकात पदार्पण केलं. भारताने रविवारी न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांचे आव्हान भारताने सहा विकेट गमावून सहज पार केले. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने तो न्यूझीलंडविरुद्ध सामन्याबाहेर गेला. पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला खेळण्याची संधी मिळाली. 


एकदिवसीय विश्वचषकात 'सूर्या'चं पदार्पण


न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने (India vs New Zealand) विश्वचषकात (ICC ODI World Cup 2023) सलग पाचवा विजय मिळवला आहे. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यामुळे सूर्यकुमारला प्लेईंग 11 मध्ये सामील करण्यात आलं. मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरलेला सूर्यकुमार अवघ्या दोन धावांवर रनआऊट झाला. विराट कोहलीसोबत भागीदारी करताना सूर्या आऊट झाला. 


दोन धावांवर 'सूर्या' पॅव्हेलियनमध्ये


सूर्यकुमार यादवने 34 व्या षटकातील पाचवा चेंडू कव्हर्सकडे खेळला आणि धावा काढण्यासाठी धावला. विराटनेही सूर्याच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि तोही क्रीझच्या खूप पुढे गेला. मात्र, सँटनरने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत चेंडू रोखून गोलंदाजाच्या दिशेने फेकला. तोपर्यंत सूर्याने अर्ध्याहून अधिक क्रीज ओलांडली होती, मात्र विराट सूर्याकडे पाहण्याऐवजी क्षेत्ररक्षकाकडे डोळे लावून बसला होता. कोहली क्रीजच्या पुढे आला, पण सँटनरच्या थ्रोनंतर मागे परतला. बोल्टने लगेच चेंडू पकडला आणि तो कीपरच्या दिशेने फेकला आणि लॅथमने स्टंप आऊट केलं. यावेळी सूर्या क्रीजपासून दूरच होता. धावबाद झाल्यानंतर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. सूर्या केवळ 2 धावा करून तंबूत परतला.


सूर्यकुमार बाद कसा झाला? पाहा व्हिडीओ :






भारताचा सलग पाचवा विजय


न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने यंदाच्या विश्वचषकातील सलग पाचवा विजय मिळवला आहे. नाणेफक जिंकून कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतानसमोर 274 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात विराट कोहलीने 95, रोहित शर्माने 46, श्रेयस अय्यरने 33 आणि रविंद्र जाडेजाने नाबाद 39 धावांचे योगदान दिलं. शमीने  पाच विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.