India vs Netherland, Toss Update : ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध नेदरलँड (IND vs NED) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल भारताच्या दिशेने लागला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे नेदरलँडचा संघ खास फॉर्मात नसल्याने प्रथम फलंदाजी करत भारत एक मोठी विक्रमी धावसंख्या देखील उभारु शकतो.

भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारत सध्या कमाल फॉर्मात असल्याने आज त्यांना एक मोठी विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या विजयामुळे ग्रुप 2 गुणतालिकेत भारत आणखी मजबूत आघाडी घेऊ शकतो. तसंच सेमीफायनलमध्येही पोहोचण्यासाठी भारताला आजचा विजय फायदेशीर असेल. पाकिस्तानला मात दिल्यामुळे 2 गुण खात्यावर असणाऱ्या भारताच्या खात्यावर आजच्या विजयानंतर एकूण 4 गुण होतील.

कसा आहे ग्रुप 2 चा पॉईंट टेबल?

POS TEAM PLD WIN LOST TIED N/R NET RR PTS
1 बांग्लादेश 1 1 0 0 0 +0.450 2  
2 भारत 1 1 0 0 0 +0.050 2  
3 दक्षिण आफ्रीका 1 0 0 0 1 - 1  
4 झिम्बाब्वे 1 0 0 0 1 - 1  
5 पाकिस्तान 1 0 1 0 0 -0.050 0  
6 नेदरलँड 1 0 1 0 0 -0.450 0  

 पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 4 गडी राखून दमदार मात दिल्यामुळे आज भारताने संघात एकही बदल केला नसून आहे त्या टीमबरोबर भारत मैदानात उतरला आहे. रोहित शर्माने नाणेफेकीनंतर बोलताना पहिल्या सामन्यातील विजयामुळे आमची मानसिक ताकद आणखी वाढली असल्याचं सांगितलं. तसंच संघात कोणताही बदल केला नसल्याचंही तो म्हणाला.

कशी आहे टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

कसा आहे नेदरलँडचा संघ?

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ विकेटकिपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओडॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन, 

पहिल्यांदाच भारत नेदरलँड टी20 मध्ये आमने सामने

आजवर भारत आणि नेदरलँड दोघेही एकदिवसीय सामन्यात आमने-सामने आले असले तरी टी20 फॉर्मेटमध्ये दोन्ही संघाचा एकमेंकाविरुद्ध आजचा पहिलाच सामना असेल. नेदरलँड आणि भारत यांच्यात आजवर फक्त दोनच सामने झाले असून हे दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. या दोन्ही संघांनी आधी फेब्रुवारी 2003 मध्ये पहिला सामना खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाने 68 धावांनी विजय मिळवला. तर दुसरा सामना मार्च 2011 मध्ये झाला होता. भारताने हा सामना 5 विकेट्सनी जिंकला. ज्यानंतर आज दोघेही पहिलाच टी20 सामना ते देखील टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीमध्ये खेळत आहेत.