World Cup 2023 Final : आज अहमदाबादमध्ये (Ahmedabad) विश्वचषकाच्या (World Cup 2023) महाअंतिम सामन्याचा थरार (IND vs AUS Final) पाहायला मिळणार आहे. रविवारी, 19 नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज झाला असून समोर पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. कांगांरूसोबत 20 वर्षांआधीचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात पावसाने अडथळा आणल्यास फायनलबाबत चाहत्यांची निराशा होईल. आजच्या सामन्यात पाऊस पडल्यास पुढे काय होईल? आज अहमदाबादमधील हवामान (Weather Forecast) आणि नरेंद्र मोदी स्टेडिअमची (Narendra Modi Stadium) खेळपट्टी (Pitch Report) कशी असेल, याबाबत सविस्तर जाणून घ्या.


अहमदाबादमधील हवामान कसं असेल?


क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आज अहमदाबादेत आकाळ निरभ्र राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज अंतिम सामन्याच्या दिवशी हवामान स्वच्छ राहणार आहे. आज दुपारचे तापमान 32°C च्या आसपास असणे अपेक्षित आहे, हळूहळू सूर्यास्ताच्या वेळी तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे, तेव्हा कमाल तापमान 28°C पर्यंत कमी होईल आणि त्यानंतर तापमानात आणखी घट होईल. आज सामन्याच्या दिवशी पावसाची कोणतीही शक्यता नाही. अहमदाबादमध्ये आर्द्रता सुमारे 33 टक्के असेल ती संध्याकाळनंतर अंदाजे 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.


अहमदाबादची खेळपट्टी कशी आहे? (Narendra Modi Stadium Pitch Report)


आजचा ऐतिहासिक सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये होत असून यामध्ये 130,000 प्रेक्षक सामना पाहू शकतात. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर धावांचा पाऊस पडू शकतो. फलंदाजांची येथे चांदी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे. अहमदाबादच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार आहे. गोलंदाजांनाही येथे थोडी मदत मिळण्याची शक्यता आहे. सामना पुढे जसा जाईल तशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता जास्त आहे. मोठं मैदान असल्यामुळे गोलंदाज न घाबरता चेंडू टाकू शकतील. 


नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी आतापर्यंत या स्पर्धेत फलंदाज आणि क्षेत्ररक्षक दोघांसाठी चांगली ठरली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या त्रिकूटासमोर टिकणं कांगांरूसाठी कठीण जाईल. या स्टेडियममध्ये कोरडा आणि कणखर पृष्ठभाग वेगवान गोलंदाजीसाठी पोषक ठरेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Jasprit Bumrah : एकवेळ एके-47 चा नेम चुकेल, पण बुमराहच्या याॅर्करचा नाही; टीम इंडियाचं 'बुमरास्त्र'!