T20 World Cup 2022: पर्थ क्रिकेट स्टेडियवर (Perth Stadium) भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात टी-20 विश्वचषकातील सुपर-12 फेरीतील सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रोहित शर्माचा हा निर्णय अयोग्य ठरल्याचं दिसलं. भारतानं 20 षटकात नऊ विकेट्स गमावून द.आफ्रिकेसमोर 134 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात रोहित शर्मा, केएल राहुल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पूर्णपणे अपयशी ठरले. मात्र, भारताकडून सूर्याकुमार यादवनं (Suryakumar yadav) एकाकी झुंज दिली. त्यानं या सामन्यात 40 चेंडूत 68 धावांचं योगदान दिलं.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल स्वस्तात माघारी परतले. रोहित शर्मानं 14 चेंडूत 15 धावा तर, केएल राहुल 14 चेंडू 9 धावा केल्या.विराट कोहलीही 11 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला. त्यावेळी भारताची धावसंख्या पाच षटकात 26/2 अशी होती. दरम्यान, अवघ्या 50 धावांच्या आत भारताचा निम्मा संघ पव्हेलियनमध्ये परतला. दिपक हुडा (3 चेंडू शून्य धाव), हार्दिक पांड्या दोन धावा करून बाद झाला. मात्र, एका बाजूनं सूर्याकुमारनं एकाकी झुंज सुरूच ठेवली. परंतु, आठराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्यानं 40 चेंडूत 68 धावांचं योगदान दिलं.
भारताचं द.आफ्रिकेसमोर 134 धावांचं आव्हान
टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्रीच्या दृष्टीनं महत्त्वाचा सामना सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सुरु आहे. पण याच महत्त्वाच्या सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. दक्षिण आफ्रिकेनं भेदक गोलंदाजी करत भारताला अवघ्या 133 धावांवर रोखलं.दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, पारनेलच्या खात्यात तीन विकेट्स जमा झाल्या. याशिवाय, नॉर्खियानं एक विकेट्स मिळवली.
रोहित शर्माचा विश्वविक्रम
रोहित शर्मा हा टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा आज (30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील 36वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलला होता. याबाबतीत त्यानं श्रीलंकेचा माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशानचा विक्रम मोडला आहे. तिलकरत्ने दिलशाननं टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 35 सामने खेळले आहेत. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाकीबनं टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 34 सामने खेळले आहेत. याचबरोबर सर्वाधिक टी-20 विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूच्या यादीतही रोहित शर्मा आणि शाकीब अल हसन अव्वल आहेत. दोघंही आठव्यांदा टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळत आहेत.
ट्वीट-
हे देखील वाचा-