India vs South africa, Toss Update : ऑस्ट्रेलियातील पर्थमधील क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेक आजही भारतानं जिंकली आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेदरलँडविरुद्ध देखील भारतानं प्रथम फलंदाजीच घेतली होती. ज्यानंतर आजही प्रथम फलंदाजी करत एक मोठी विक्रमी धावसंख्या उभारुन आधीच दक्षिण आफ्रिकेवर प्रेशर टाकण्याचा भारताचा डाव आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारत आणि दक्षिण आफ्रिका सध्या दोघेही कमाल फॉर्मात असल्याने आज दोघांना विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या विजयामुळे ग्रुप 2 गुणतालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातीस एकजण आणखी मजबूत आघाडी घेऊ शकतो. तसंच सेमीफायनलमध्येही पोहोचण्यासाठी दोघांना आजचा विजय अत्यंत फायदेशीर असेल.
भारतीय संघ एका बदलासह मैदानात
भारतानं विश्चचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून दोन्ही सामने जिंकले आहेत. आधी पाकिस्तानला 4 विकेट्सनी मात दिल्यानंतर नेदरलँडविरुद्धचा सामनाही भारताने 56 धावांनी जिंकला. ज्यानंतर देखील भारतानं आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक बदल संघा केला आहे. त्यांनी अष्टपैलू अक्षर पटेलला (Axar Patel) विश्रांती देत दीपक हुडाला (Deepak Hooda) संघात संधी दिली आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत संघात नसल्यानं त्याला संधी मिळेल असे वाटत होते. पण आज मात्र दीपक हुडाला संधी देत टीम इंडियानं काहीसा वेगला निर्णय घेतला आहे.
कशी आहे टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, दीपक हुडा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.
कसा आहे दक्षिण आफ्रिका संघ?
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी.
IND vs SA हेड टू हेड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघानं 13 सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेनं नऊ सामन्यात बाजी मारली आहे. यातील एक सामना अनिर्णित ठरला आहे. सध्याची आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्याची टी-20 मालिकाही जिंकली होती.