PAK vs NED, T20 World Cup 2022: पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड (Pakistan vs Netherlands) यांच्यात नुकताच ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे सुपर-12 फेरीतील सामना खेळला गेला. या सामन्यात दमदार खेळ दाखवत पाकिस्तानने 6 गडी राखून नेदरलँडला मात दिली. आधी नेदरलँडला अवघ्या 91 धावांत रोखत त्यानंतर 13.5 षटकांत 4 गडी गमावून हे लक्ष्य पार केलं. विशेष म्हणजे पाकिस्तानचा स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. याआधी पाकिस्तानला आधी भारताने 4 विकेट्सनी तर झिम्बाब्वेने अवघ्या एका धावेने मात दिली होती.






सामन्यात सर्वप्रथम नेदरलँडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यंदा नेदरलँडची गोलंदाजी चांगली होत असल्याने आधी फलंदाजी करुन एक चांगला स्कोर करायचा आणि मग पाकिस्तानला कमी धावांत रोखून सामना जिंकण्याचा डाव त्यांनी आखला होता. पण त्याऊलट पाकिस्ताननेच भेदक गोलंदाजी करत अवघ्या 91 धावांत नेदरलँडचा डाव आटोपला. केवळ अॅकरमॅनने 27 धावा केल्या. नेदरलँडकडून या सर्वाधिक धावा ठरल्या. कर्णधार एडवर्ड्सनेही 15 धावा केल्या असून इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. 


त्यानंतर 92 धावा करण्यासाछी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सहज हे लक्ष्य पूर्ण केले. 13.5 षटकातच पाकिस्तानने लक्ष्य पूर्ण केलं. त्यांचे 4 गडी बाद झाले खरे पण लक्ष्य फारच कमी असल्याने अखेर विजय पाकिस्तानचाच झाला. यावेळी मोहम्मद रिझवानने 49 धावांची दमदार खेळी करत जवळपास एकहाती विजयाजवळ भारताला आणलं. फखर जमानने 20 तर तर शान मसूदने 12 धावा केल्या. या विजयासह पाकिस्तानने अखेर स्पर्धेतील पहिला विजय मिळवला आहे. 


हे देखील वाचा-