Suryakumar Yadav: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात (India vs South Africa) भारताला पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 20 षटकात नऊ विकेट्स गमावून दक्षिण आफ्रिकेसमोर 133 धावांचं लक्ष्य ठेवलं. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.4 षटकात हे लक्ष्य गाठलं.या सामन्यात भारताकडून एकाकी 68 धावांची खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवनं (Suryakumar yadav) गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि युवराज सिंह (Yuvraj Singh) यांच्या पंक्तीत स्थान मिळवलं.टी-20 विश्वचषकात दोन अर्धशतक झळकावणारा सूर्या सहावा भारतीय फलंदाज ठरलाय. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी 40 चेंडूत 68 धावांची खेळी केली. ज्यात 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. सूर्याचा यंदाच्या विश्वचषकातील दुसरं अर्धशतक आहे. यापूर्वी नेदरलँड्सविरुद्ध त्यानं नाबाद 51 धावांची खेळी केली होती. भारताकडून सलग दोन शतक झळकावणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी विराट कोहीली, गौतम गंभीर आणि युवराज सिंहनं हा पराक्रम केला होता. 

भारतासाठी टी-20 विश्वचषकात सलग दोन अर्धशतकं झळकावणारे फलंदाज-
2007 च्या विश्वचषकात गौतम गंभीरनं सलग दोन अर्धशतकं झळकावलं होतं. याच स्पर्धेत युवराज सिंहनंही सलग दोन अर्धशतकं ठोकली. त्यानंतर 2014 विश्वचषकात विराट कोहली आणि आणि 2022 च्या विश्वचषकात केएल राहुलनं दोन अर्धशतकं झळकावण्याची कामगिरी केली. या यादीत सूर्यकुमारचाही समावेश झालाय. 

 

फलंदाज वर्ष सलग दोन अर्धशतकं
गौतम गंभीर 2007 51, 58
युवराज सिंह 2007 58, 70
रोहित शर्मा 2014 62, 56*
विराट कोहली 2014 54, 57*
विराट कोहली 2014 72*, 77
विराट कोहली 2016 82*, 89*
केएल राहुल 2021 69, 50
विराट कोहली 2022 82*, 62*
सूर्यकुमार यादव 2022 51*, 68

 

हे देखील वाचा-