India vs Australia World Cup Final : विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) चा विजेतेपद सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे होणार आहे. विश्वचषकात टीम इंडियाची (Team India) शानदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. रोहित सेनेनं या विश्वचषकातील सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग विजय मिळवत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा त्याच प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल, असे दिसते. पण, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेगाफायनलमध्ये संघात बदल करू शकतो. 


रोहित शर्मा मोठा निर्णय घेणार?


ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोठा बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विश्वचषकाच्या महाअंतिम सामन्यात रोहित शर्मा 'ब्रम्हास्त्र' काढणार असल्याचं म्हटलं जात आहे. फायनलच्या सामन्यात रविचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फायनलच्या सामन्यात भारताच्या प्लेईंग 11 मध्ये सूर्यकुमार यादव ऐवजी अश्विनला संधी मिळेल, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्यार असल्याची चर्चा आहे.


मेगाफायनलपूर्वी टीम इंडियात बदल?


ऑस्ट्रेलिया संघाची एक कमतरता दिसून आली आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रीम स्वानच्या मते, ऑस्ट्रेलियन संघाला फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करावा लागत आहे, ही त्यांची मोठी कमतरता आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाकडे मुख्य फिरकीपटू म्हणून फक्त अॅडम झाम्पा आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाचं ब्रम्हास्त्र अश्विनला संधी मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय, टीम इंडियाची सलामीच्या फलंदाजांची फळी तगडी आहे, यामुळे सूर्यकुमार यादववर सामन्यात खेळण्याची जास्त वेळ आलेली नाही. मात्र, हीच संधी अश्विनला दिल्यास भारतीय संघाकडे प्लस पॉईंट वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


बुमराहच्या भेदक माऱ्याला तोड नाही


टीम इंडियाच्या यशात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहने प्रभावी गोलंदाजी केली. बुमराहच्या नावावर एक खास विक्रम आहे. या विश्वचषकात तो आतापर्यंत सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने आतापर्यंत 268 डॉट बॉल टाकले आहेत. टक्केवारीनुसार हे प्रमाण 70 टक्के आहे. या यादीत आर्यन दत्त दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 58.4 टक्के डॉट बॉल टाकले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IND vs AUS : मेगाफायनलसाठी अंपायर्सचं मेगा पॅनल तयार, टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारं एक नाव; 'या' अंपायरमुळे धाकधूक वाढली