T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषकाची ट्रॉफी (T20 World Cup 2022) पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये येथे पोहोचली असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचसह महिला क्रिकेटपटू जॉर्जिया वेरहॅम आणि टायला व्लामिंक हे सर्व त्याठिकाणी उपस्थित होते. याशिवाय पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूस, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल आणि शेन वॉटसन हे देखील उपस्थित होते. टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीची वर्ल्ड टूर 8 जुलै रोजी पापुआ न्यू गिनी येथून सुरू झाली. युरोपसह जगाभर प्रवास केल्यानंतर ही ट्रॉफी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये पोहोचली आहे.
ट्रॉफी मेलबर्नला पोहोचल्यावर तिथे उपस्थित फॅन्स कमालीचे उत्साही दिसत होते. चाहत्यांना T20 विश्वचषक ट्रॉफी जवळून पाहण्याची संधी यावेळी मिळाली. यासोबतच त्यावेळी माजी दिग्गज क्रिकेटर उपस्थित असल्याने फॅन्स आणखी आनंदी दिसत होते. ऑस्ट्रेलियामध्ये, ट्रॉफी क्वीन्सलँडमधील हॅरी पॉटर अँड द कर्स्ड चाइल्डच्या सेटवरून ग्रेट बॅरियर रीफवर आणण्यात आली, जेणेकरून शक्य तितक्या चाहत्यांना ती जवळून पाहता येईल. याशिवाय ही ट्रॉफी ब्रिस्बेन, इप्सविच ग्रामर स्कूल आणि गोल्ड कोस्ट येथेही आणण्यात आली.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ आमने-सामने
टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघामध्ये स्पर्धा रंगणार आहे. ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, स्कॉटलँड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, यूएई, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेच्या संघाचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या या आठ संघांनी सुपर 12 साठी पात्रता मिळवली आहे.
कुठे रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-