T20 World Cup Final: बेन स्टोक्स आणि सॅम करनच्या दमदार खेळीच्या बळावर इंग्लंडनं विश्वचषकावर नाव कोरलं. जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघानं फायनलमध्ये पाकिस्तानचा पाच विकेटनं पराभव केला. फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांची मनं तुटली. अनेकजण निराश झाले होते. सामन्यानंतर अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही पराभवानंतर सोशल मीडियावर ट्वीट केले आहेत. यामध्ये वेगवागन गोलंदाज शोएब अख्तर यानेही पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर ट्वीट केले आहे. शोएबच्या ट्वीटला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याने प्रत्युत्तर दिलं आहे. मोहम्मद शामीचं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. शामीच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानचे चाहत्यांचं सोशल वॉर सुरु झालेय.
इंग्लंडनं पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषक उंचावल्यानंतर निराश झालेल्या शोएब अख्तरनं 💔 असं ट्वीट केले होते. याला मोहम्मद शामीनं रिप्लाय दिलाय. Sorry brother It’s call karma 💔💔💔 असं ट्वीट करत शामीनं शोएब अख्तरला उत्तर दिलेय. शामीचं हे ट्वीट चर्चेचा विषय झालाय. यावर भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये सोशल वॉर सुरु झालेय. अनेकांनी यावर रिप्लाय देत खिल्ली उडवली आहे. तर काही पाकिस्तानच्या चाहत्यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याचं स्कोअरबोर्ड शेअर करत शामीला उत्तर दिलं आहे. भारतीय चाहत्यांनी शामीच्या बाजूनं ट्वीट केले आहेत.
मोहम्मद शामीचं ट्वीट -
सामन्यात काय झालं?
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघानं निर्धारित 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 137 धावांपर्यंत मजल मारली होती. शान मसूद (38) आणि बाबर आझम (32) यांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडकडून सॅम करनने भेदक मारा केला. सॅम करन याने 12 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. अदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत सॅम करनला चांगली साथ दिली. पाकिस्ताननं दिलेलं 138 धावांचं आव्हान इंग्लंड संघाने 19 व्या षटकात पार केलं. बेन स्टोक्स याने 52 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्याशिवाय कर्णधार जोस बटलर याने 26 धावांची खेळी केली.