T20 World Cup 2022 Player of the Tournament : टी20 विश्वचषक स्पर्धेची (T20 World Cup 2022) फायनल जिंकत इंग्लंडने विश्वचषकावर नाव कोरलं आहे. फायनलमध्ये 5 विकेट्सनी पाकिस्तानला मात देत इंग्लंडनं इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करत इंग्लंडचा स्टार गोलंदाज सॅम करननं (Sam Curran) सामनावीराचा पुरस्कार मिळवलाच आहे. पण संपूर्ण मालिकेतही त्यानं अफलातून गोलंदाजी करत मालिकावीर म्हणूनही पुरस्कार जिंकला आहे.

टी20 वर्ल्डकप 2007 मध्ये चालू झाला असून तेव्हापासून पहिल्यांदाच एका गोलंदाजाला हा मान मिळाला आहे. सॅमनं 11.38 च्या अॅव्हरेजनं 13 विकेट्स घेतल्या असून फायनलमध्ये तर 4 ओव्हरमध्ये फक्त 12 रन देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने एका सामन्यात 5 विकेट्सही घेण्याचा मान मिळवला आहे. यंदा टी20 विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासून इंग्लंडनं चांगली कामगिरी केली. डीएलएसच्या नियमाच्या गणितांमुळे एका सामन्यात आयर्लंडने त्यांना मात दिली, ज्यामुळे त्यांना सेमीफायनमध्ये पोहचण्यासाठी थोडी कसरत घ्यावी लागली. पण अखेर यशस्वीरित्या त्यांनी सेमीफायनल गाठून आधी भारताला आणि आता पाकिस्तानला मात देत विश्वचषक जिंकला आहे.

टी20 विश्वचषक इतिहासांत मालिकावीर मिळालेले खेळाडू

टी20 विश्वचषक मालिकावीर
2007 टी20 विश्वचषक शाहिद आफ्रिदी
2009 टी20 विश्वचषक तिलकरत्ने दिलशान
2010 टी20 विश्वचषक केविन पीटरसन
2012 टी20 विश्वचषक शेन वॉटसन
2014 टी20 विश्वचषक विराट कोहली
2016 टी20 विश्वचषक विराट कोहली
2021 टी20 विश्वचषक डेव्हिड वॉर्नर
2022 टी20 विश्वचषक सॅम करन

हे देखील वाचा-