World Cup 2023 Astrology Prediction : सध्या भारतात विश्वचषकाचा (World Cup 2023) थरार सुरु असून रविवारी अंतिम सामना रंगणार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 ला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. यंदाचा विश्वचषक (ICC World Cup 2023) भारतात (India) होत असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. टीम इंडियाने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकल्याने भारतीय चाहत्यांना यंदा जास्त अपेक्षा आहेत. विश्वचषक 2023 मध्ये दहा संघांमध्ये लढता होती, त्यातील दोन संघ फायनलमध्ये पोहोचले आहेत. या विश्वचषकाचा विजेता कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 19 नोव्हेबरला क्रिकेट विश्वविजेता मिळणार आहे. पण, त्याआधीच विश्वचषक 2023 च्या विजेत्या संघाबाबत एका ज्योतिषानं (Astrologer) मोठी भविष्यवाणी केली आहे. 


कोण होणार विश्वविजेता?


ज्योतिषी शास्त्रज्ञाने (Astrology) वर्ल्ड कप 2023 (ODI World Cup 2023) च्या विजेत्याबाबत केलेली भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय आहे. '1987 मध्ये जन्मलेला कर्णधार विजयी होणार', अशी भविष्यवाणी या ज्योतिषीनं केली आहे. वैज्ञानिक ज्योतिषी (Scientific Astrologer) ग्रीनस्टोन लोबो (Greenstone Lobo) यांनी विश्वचषक (World Cup 2023 Winner) विजेत्याबाबत भविष्यवाणी (Prediction) केली आहे. यांची ही भविष्यवाणी सध्या चर्चेत आहे. 


विश्चचषकाबाबत ज्योतिषाची भविष्यवाणी!


वैज्ञानिक ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो (Greenstone Lobo) यांनी विश्वचषक विजेत्या संघाबाबत भविष्यवाणी करत म्हटलं आहे की, 1987 मध्ये जन्मलेला कर्णधार (Captain Born in The Year 1987) भारतात होणारा पुरुष एकदिवसीय विश्वचषक (Men's ODI World Cup in India) जिंकेल.  ग्रीनस्टोन लोबो यांनी दावा केला आहे की, 1986 मध्ये जन्मलेले खेळाडू आणि कर्णधारांपेक्षा 1987 मध्ये जन्मलेल्या खेळाडूंकडून अलिकडच्या काळातील क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ग्रीनस्टोन लोबो यांनी 2011, 2015 आणि 2019 क्रिकेट विश्वचषक विजेत्या (Cricket World Cup) संघांबाबतही भाकीत केलं होतं, जे अचूक ठरलं होतं.




याआधीच्या तीन विश्वचषकाचं परफेक्ट भाकीत


वैज्ञानिक ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी एका व्हिडीओमध्ये विजेत्या संघाबद्दल भाकीत करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.  लोबो सांगितलं की, 2019 मध्ये इंग्लंडने विश्वचषक जिंकला तेव्हा 1986 मध्ये जन्मलेला इयॉन मॉर्गन हा कर्णधार होता. टेनिस सुपरस्टार नोव्हाक जोकोविच, ज्याने राफेल नदालला मागे टाकले, त्याचा जन्म 1987 मध्ये झाला, तर नदालचा जन्म 1986 मध्ये झाला. 2022 मध्ये नुकताच झालेला फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनाने लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली जिंकला. मेस्सीचा जन्म 1987 मध्ये झाला. 2018 फिफा विश्वचषक फ्रान्सने जिंकला, तेव्हा ह्यूगो लोरिस कर्णधार होता, त्याचा जन्म 1986 मध्ये झाला. त्यामुळे यंदाचा विश्वचषक 1986 मध्ये जन्मलेला कर्णधार जिंकेल अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे.


यंदाचा विश्वचषक 'हा' कर्णधार जिंकणार? 


विश्वचषक 2023 स्पर्धेत सामील संघांपैकी दोन संघांचे कर्णधार 1987 मध्ये जन्मले होते. 'बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनचा जन्म 1987 मध्ये झाला आहे, पण बांगलादेश संघ आधीच स्पर्धेतून बाहेर गेला आहे. ग्रीनस्टोन लोबो पुढे सांगितलं की, ' 1987 मध्ये जन्मलेला दुसरा कर्णधार म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा. तो विश्वचषक जिंकेल.'' असं भाकित ग्रीनस्टोन लोबो यांनी केलं आहे.