Australia T20 World Cup squad : ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आगामी टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने खेळवले जातील. याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मायदेशात होणाऱ्या विश्वचषकासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आपल्या संघाची घोषणा केली आहे. संघाचं नेतृत्व एरॉन फिंचकडेच सोपवण्यात आले आहे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी पॅट कमिन्सकडे दिली आहे. गतवर्षी झालेल्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियानं नाव कोरलं होतं. त्या संघामध्ये फक्त एक बदल करण्यात आलेला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं फिरकीपटू मिचेल स्वेपसन याला वगळलं आहे. त्याच्याजागी अष्टपैलू टिम डेविडला स्थान देण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं विश्वचषकासाठी आणि त्याआधी भारताविरोधात होणाऱ्या टी20 मालिकेसाठी संघाची निवड केली आहे. भारताविरोधात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी डेविड वॉर्नरला आराम देण्यात आला आहे. वॉर्नरच्या जागी कॅमरून ग्रीनला स्थान देण्यात आलं आहे. टी 20 विश्वचषकापूर्वी भारताविरोधात तीन सामन्याची मालिका होणार आहे. 20, 23 आणि 25 सप्टेंबर रोजी मोहाली, नागपूर आणि हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये सामने रंगणार आहेत.
वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
एरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, मार्कस स्टोयनिस, एश्टन एगर, पॅट कमिन्स, टिम डेविड, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क आणि एडम जाम्पा.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
एरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, मार्कस स्टोयनिस, एश्टन एगर, पॅट कमिन्स, टिम डेविड, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क आणि एडम जाम्पा.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) काही दिवसांपूर्वी आगामी पेटीएम सीरिज ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार येत्या सप्टेंबर महिन्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मोहाली येथे खेळला जाईल. तर, दुसरा आणि तिसरा टी-20 सामना नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहे.
भारत- ऑस्ट्रलिया यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 20 सप्टेंबर 2022 | मोहाली |
दुसरा टी-20 सामना | 23 सप्टेंबर 2022 | नागपूर |
तिसरा टी-20 सामना | 25 सप्टेंबर 2022 | हैदराबाद |
विश्वचषकात कसे आहेत ग्रुप? -
ग्रुप 1 | ग्रुप 2 |
अफगाणिस्तान | भारत |
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान |
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका |
न्यूझीलंड | बांग्लादेश |
ग्रुप 'ए' मधील विजेता संघ | ग्रुप 'बी' मधील विजेता संघ |
ग्रुप 'बी' मधील रनरअप संघ | ग्रुप 'ए' रनरअप संघ |