AUS vs SL, Live Streaming : यजमान ऑस्ट्रेलिया 7 विकेट्सने विजयी, श्रीलंकेला दिली तगडी मात
SL vs AUS : यजमान संघ ऑस्ट्रेलियाने (Team Australia) यंदा खास कामगिरी केली नसून पहिला सामना त्यांनी गमावल्यामुळे आज त्यांना विजय मिळवणं अत्यत महत्त्वाचं असणार आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Oct 2022 04:12 PM
पार्श्वभूमी
AUS vs SL, T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाचा संघ (Australia Team) आज मैदानात उतरणार आहे. समोर श्रीलंका संघाचं आव्हान असून टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) 2022 स्पर्धेत कांगारुंसाठी...More
AUS vs SL, T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाचा संघ (Australia Team) आज मैदानात उतरणार आहे. समोर श्रीलंका संघाचं आव्हान असून टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) 2022 स्पर्धेत कांगारुंसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या सामन्यात त्यांना न्यूझीलंड संघाने 89 धावांनी (Australia vs New Zealand) तगडी मात दिली होती. ज्यानंतर त्यांना या सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. कारण ऑस्ट्रेलियाने आता सामने गमावले तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत खूप मागे पडू शकतात. दुसरीकडे श्रीलंका संघाचा विचार करता संघाने मात्र त्यांच्या सलामीच्या सामन्यात आयर्लंड संघावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. यामुळे ग्रुप 2 च्या गुणतालिकेत श्रीलंका दुसऱ्या स्थानी तर ऑस्ट्रेलिया शेवटच्या अर्थात सहाव्या स्थानी आहेत. कसे आहेत दोन्ही संघ?ऑस्ट्रेलियाचा संघआरॉन फिंच (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हीड, जोश हेझलवुड, जोश इंगलिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हीड वॉर्नर, एडम झाम्पा.श्रीलंका संघ दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वनिन्दु हसरंगा, महेश थीक्षाना, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा (फिटनेस टेस्ट बाकी), लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशनकधी, कुठे पाहाल सामना?ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (Australia vs Sri Lanka) हा टी20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील (Super 12 Matches) सामना आज अर्थात 25 ऑक्टोबर रोजी खेळवला जात असून भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे. आजचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघातील (AUS vs SL) सामना ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथील पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. हे देखील वाचा-T20 WC 2022 : सामन्याला काही वेळ असतानाच अॅडम झाम्पाला कोरोनाची बाधा, श्रीलंकेविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात मैदानात उतरणार?