मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2019 तोंडावर असताना भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.  आयपीएल सामन्यादरम्यान भारताचा अष्टपैलू शिलेदार केदार जाधवला क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आयपीएलच्या उर्वरित सामन्यांतून केदारला मुकावं लागल आहे.


इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल. अशातच आयपीएलदरम्यान केदार जाधवला झालेली दुखापत चिंतेची बाब ठरणार आहे. मात्र जर केदारला दुखापतीमुळे खेळता आल्यास त्याच्या ऐवजी कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळेल याबद्दल तर्कवितर्क केले जात आहेत.

केदार जाधवला विश्वचषकाआधी फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे. जर केदारने चाचणीचा हा टप्पा पार केल्यास भारतीय क्रिकेट संघातील त्याचं स्थान कायम राहणार आहे. पण केदार हा चाचणीचा टप्पा पार करण्यास अयशस्वी ठरल्यास त्याच्या जागी भारताच्या अन्य पाच खेळाडूंपैकी एकाची वर्णी लागणार आहे.

VIDEO | रवींद्र जाडेजाच्या वर्ल्डकप सिलेक्शनमागे भाजपचा हात? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



कोण आहेत हे पाच खेळाडू?

1. अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू 

सामने – 55

धावा – 1694

अॅव्हरेज – 47

2. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत 

सामने – 5

धावा – 93

अॅव्हरेज- 23.2

3. युवा फलंदाज श्रेयस अय्यर

सामने – 6

धावा – 210

अॅव्हरेज- 42

4. मनीष पांडे

सामने – 23

धावा – 440

अॅव्हरेज- 36

5. युवा फलंदाज शुभमन गिल

सामने – 2

धावा – 16

अॅव्हरेज- 8

VIDEO | विश्वचषकात हार्दिक पंड्याकडून स्पेशल कामगिरीची अपेक्षा : युवराज सिंग | मुंबई | एबीपी माझा



विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी यांचा समावेश संघात करण्यात आला आहे.

भारताकडे काय आहे?

जगातील सर्वोत्कृष्ट तीन क्रिकेटपटू

जगातील सर्वोत्कृष्ट जलदगती गोलंदाज

दोन उत्कृष्ट जलदगती गोलंदाज

जगातील दोन उत्तम फिरकीपटू

अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज

भारताकडे काय नाही?

मधळ्या फळीतला डावखुरा फलंदाज

डावखुरा जलदगती गोलंदाज

प्रस्थापित मधली फळी

दहा षटकं टाकू शकेल असा अष्टपैलू जो दोन प्रमुख गोलंदाजांना साथ देईल

संबंधित बातम्या

World Cup 2019 : रिषभ पंत, अंबाती रायुडू, नवदीप सैनी भारताचे स्टँडबाय खेळाडू

World Cup 2019 : मी तर धोनीचा 'फर्स्ट एड किट' : दिनेश कार्तिक

टीम इंडियातील 15 जणांसोबत 'हे' चार क्रिकेटपटूही विश्वचषक दौऱ्यावर

वर्ल्डकपसाठीच्या संघात निवड झाल्यानंतर चार तासांत रवींद्र जडेजाचा भाजपाला पाठिंबा जाहीर

टीम इंडियाची निवड करणाऱ्यांनी स्वत: किती क्रिकेट खेळलंय... वाचा

World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?

विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड