लंडन : सर्बियाच्या नंबर वन नोवाक ज्योकोविचने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचं आव्हान मोडून काढलं आणि कारकीर्दीत सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत फेडररचं आव्हान 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 असं मोडून काढलं. त्याने पाचवा आणि निर्णायक सेट सुपर टायब्रेकरमध्ये जिंकला. ज्योकोविचचं आजवरच्या कारकीर्दीतलं हे विम्बल्डनचं पाचवं आणि सोळावं ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद ठरलं. तर दुसरीकडे दोन चॅम्पियनशिप पॉईंट गमावल्यामुळे फेडररचं नवव्या विम्बल्डन विजेतेपदाचं स्वप्न थोडक्यात हुकलं.
ज्योकोविच आणि फेडररमधलाहा सामना तब्बल 4 तास 57 मिनिटं रंगला होता. विम्बल्डनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अंतिम सामना आहे. 2008 मध्ये रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यात झालेल्या सामन्यापेक्षा हा सामना 9 मिनिटं जास्त रंगला होता.
या दोन दिग्गज खेळाडूंमधील पहिला सेट अतिशय रोमांचक होता. दोन्ही खेळाडूंनी 6-6 पॉईंटपर्यंत आपली सर्व्हिस कायम ठेवला. पहिल्या सेटचा निर्णय टायब्रेकरमध्ये गेला आणि ज्योकोविचने बाजी मारत हा सेट 7-6 ने आपल्या नावावर केला. पहिला सेट गमावल्यानंतर फेडररने शानदार कमबॅक केलं आणि पुढील सेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्याने हा सेट एकतप्फे 6-1 ने जिंकत सामन्यात बरोबरी केली.
ज्योकोविच तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा लयीत दिसला आणि त्याने चांगली कामगिरी केली. दोन्ही खेळाडूंनी या सेटमध्ये आपापली सर्व्हिस कायम ठेवला आणि या सेटचा निर्णयही टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये पुन्हा एकदा ज्योकोविचचं पारडं जड ठरलं आणि त्याने हा सेट 7-4 ने आपल्या नावावर केला. 1-2 ने मागे पडल्यानंतर फेडररने चौथ्या सेटमध्ये पुनरागमन केलं आणि बघता-बघता 5-2ने आघाडी घेतली. यानंतर ज्योकोविचने कमबॅकचा प्रयत्न केला आणि पुढील दोन गेम जिंकले. पण फेडररने दहावा गेम जिंकून सेटवर 6-4 ने कब्जा केल. परिणामी सामना 2-2 ने बरोबरीत आला.
निर्णायक सेटमध्ये ज्योकोविचने सहाव्या गेममध्ये फेडररची सर्व्हिस भेदून सेटमध्ये 4-2 अशी आघाडी घेतली. पण फेडररने पुढील दोन गेममध्ये ज्योकोविचची सर्व्हिस भेदली आणि स्कोअर 3-4 केला. फेडररने पुढच्या गेममध्ये सर्व्हिस कायम ठेवत स्कोअर 4-4 असा समान केला. यानंतर ज्योकोविचने नववा गेम जिंकून सामन्यात 5-4 अशी आघाडी घेतली. फेडररने 15व्या गेममध्ये ज्योकोविचची सर्व्हिस भेदून 8-7 अशी आघाडी घेतली. पण ज्योकोविचने पुढच्याच गेममध्ये त्याची सर्व्हिस निष्प्रभ करत 8-8 ने बरोबरी केली. त्याने या गेममध्ये दोन चॅम्पियनशिप पॉईंट वाचवले. नव्या नियमानुसार 12-12 च्या स्कोअरवर सुपर टायब्रेकर घेण्यात आला आणि त्यात ज्योकोविचने बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरलं.
Wimbledon Final : सुपर टायब्रेकरमध्ये नोवाक ज्योकोविचची बाजी, पाचव्यांदा विम्बल्डनचं जेतेपद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jul 2019 08:14 AM (IST)
ज्योकोविच आणि फेडररमधलाहा सामना तब्बल 4 तास 57 मिनिटं रंगला होता. विम्बल्डनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अंतिम सामना आहे. 2008 मध्ये रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यात झालेल्या सामन्यापेक्षा हा सामना 9 मिनिटं जास्त रंगला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -