Wimbledon Final 2023: विम्बल्डनचा (Wimbledon Final 2023) अंतिम सामना नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) आणि कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) यांच्यात खेळवण्यात आला. जोकोविचचा हा सामना जिंकणार हे जवळपास सर्वच चाहत्यांनी मनात ठरवलंच होतं. पण त्याच्यात आणि अल्कारेझमध्ये खेळवण्यात आलेल्या एका रोमांचक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. अनुभवी जकोविचचा कार्लोस अल्कारेझनं 1-6,7-6,6-1,3-6,6-4 असा पराभव केला. त्याचवेळी विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. सर्बियाचा नोकाव जोकोविचला पराभव स्विकारणं काहीसं जड गेलं. रागाच्या भरात जोकोविचनं जे कृत्य केलं, ते पाहून सगळेच थक्क झाले. 


जोकोविचनं रागाच्या भरात केला रॅकेटचा चक्काचूर 


सर्बियन स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनं विम्बल्डनच्या अंतिम सामन्यातील पाचवा सेट गमावल्यानंतर रागानं त्याचं रॅकेट नेटवर मारलं, ज्यामुळे त्याच्या रॅकेटचा मधला भाग दुभंगला. त्याचं रॅकेट फोडतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्पेनचा कार्लोस अल्कारेझ फक्त 20 वर्षांचा आहे आणि तो विम्बल्डन जिंकणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. 






24वं ग्रँडस्लॅम जोकोविचच्या हातून निसटलं


36 वर्षीय नोव्हाक जोकोविचला 24वं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. जोकोविचनं फायनल जिंकली असती, तर त्याचे हे सलग पाचवं विम्बल्डन विजेतेपद ठरलं असतं. पण स्पेनचा युवा खेळाडू कार्लोस अल्कारेझनं जोकोविचच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. 


अंतिम सामना पाहण्यासाठी राजेशाही कुटुंबाचीही उपस्थिती 


नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेझ यांच्यातील विम्बल्डन फायनल पाहण्यासाठी राजघराणं आलं होतं. प्रिन्सेस डायना, केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम तसेच त्यांची दोन मुलं प्रिन्सेस शार्लोट आणि प्रिन्स जॉर्जही टेनिस कोर्टवर उपस्थित होते.  राजघराण्यातील काही अप्रतिम छायाचित्रंही कोर्टातून व्हायरल होत आहेत. प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शार्लोट या खेळाचा पुरेपूर आनंद घेत होते. मात्र, अल्कारेझनं अंतिम फेरीत टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या जोकोविचला पराभूत करून शानदार कामगिरी केली. या पराक्रमासाठी तो कायम स्मरणात राहील.


विम्बल्डन जिंकणारा स्पेनचा तिसरा खेळाडू 


कार्लोस अल्काराज विम्बल्डन  जिंकणारा स्पेनचा तिसरा खेळाडू झालाय. याआधी सेंटाना याने 1966 मध्ये आणि राफेल नडाल याने 2008, 2010 मध्ये विम्बल्डन जिंकलेय.  12 वर्षानंतर स्पेनच्या खेळाडूने पुन्हा ही स्पर्धा जिंकली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


20 वर्षीय कार्लोस अल्कारेज विम्बल्डनचा बादशाह, जोकोविचचा पराभव करत जिंकले दुसरे ग्रँड स्लॅम