Wimbledon 2022 Final: विम्बल्डन 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचनं (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसला (Nick Kyrgios) मात देऊन कारकीर्दीतील 21व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरलंय. तसेच विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याची ही त्याची सातवी वेळ आहे. या विजयासह त्यानं स्विझरलँड स्टार टेनिसपटू रॉजर फेडररचा (Roger Federer) आणखी एक विक्रम मोडलाय. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाच्या बाबतीत नोवाक जोकोविचनं रॉजर फेडररला मागं टाकलंय.
जोकोविचनं सलग चौथ्यांदा विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. या विजयासह जोकोविचच्या नावावर 21 ग्रँड स्लॅम जिंकण्याची नोंद झालीय. रॉजर फेडररनं त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत आतापर्यंत 20 ग्रँड स्लॅम जिंकली आहेत.
सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे खेळाडू-
खेळाडूंचं नाव | विजय |
राफेल नदाल (स्पेन) | 22 ग्रँड स्लॅम |
नोवाक जोकोविच (सर्बिया) | 21 ग्रँड स्लॅम |
रोजर फेडरर (स्विझरलॅंड) | 20 ग्रँड स्लॅम |
सर्वाधिक वेळा ग्रँड स्लॅमचा अंतिम सामना खेळणारे खेळाडू-
नोवाक जोकोविच | 32 |
रोजर फेडरर | 31 |
राफेल नदाल | 30 |
इव्हान लेंडल | 19 |
पीट सेम्पास | 18 |
ऐतिहासिक सेंटर कोर्टवर झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात विश्वातील अव्वल टेनिसपटू जोकोव्हिचने किरियॉसला 4-6, 6-3, 6-4, 7-3 (7-3) असं पराभूत केलं. अटीतटीच्या सामन्यात अखेर टायब्रेकर झाल्यानंतर नोवाकनं विजय मिळवत जेतेपद नावं कोरलंय.
हे देखील वाचा-
- IND vs ENG 3rd T20 : सूर्यकुमारची एकहाती झुंज व्यर्थ, भारताचा 17 धावांनी पराभव, मालिका मात्र खिशात, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
- ENG vs IND, 3rd T20 : सूर्यकुमारचं शतक व्यर्थ, इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली, 17 धावांनी भारत पराभूत
- ENG vs IND, 3rd T20 : इंग्लंडला व्हाईट वॉश देण्यासाठी भारतासमोर 216 धावांचे आव्हान, सुरुवातीपासून फटकेबाजी अनिवार्य