India vs England : इंग्लंडच्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज मैदानात पार पडणाऱ्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 215 धावांचा डोंगर उभा केला आहे. ज्यामुळे आता भारताला विजयासाठी 20 षटकात 216 धावा करायच्या आहेत. भारताला इंग्लंडला व्हाईट वॉश द्यायचा असल्यास आजचा विजय मिळवणं महत्त्वाचं आहे.
सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. भारताने सुरुवातीला इंग्लंडच्या सलामीवीरांना तंबूत धाडलं, पण नंतर डाविड मलानने (Dawid Malan) तुफान फटकेबाजी करत दमदार असं अर्धशतक लगावलं. त्याच्या कमाल खेळीमुळे इंग्लंडची धावसंख्या काही ओव्हर्समध्येच वाढली. मलानने 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 77 धावा केल्या. बिश्नोईने त्याची विकेट घेतली, पण त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने तुफान फलंदाजी केली. त्याने 29 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडने 20 षटकात इंग्लंडने 215 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. भारताकडून बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन तर आवेश आणि उमरानने प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडने उमरानला चार षटकात 56 धावा ठोकल्याने तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.
भारताच्या अंतिम 11 मध्ये महत्त्वाचे बदल
आज होणाऱ्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा संघात बदल केले आहेत. यावेळी भारताने युवा खेळाडूंना संधी देत दिग्गजांना विश्रांती दिली आहे. यावेळी रवी बिश्नोई, आवेश खान, उमरान मलिक आणि श्रेयस अय्यर यांना संधी मिळाली आहे. ज्यामुळे भुवनेश्वर, बुमराह, चहल आणि हार्दिक यांना विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडनेही दोन बदल संघात केले असून आर टोप्ले आणि फिल सॉल्ट संघात आले असून सॅम करन आणि मॅथ्यू पार्किंसन बेंचवर आहेत.
हे देखील वाचा-