मुंबई : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा चांगल्या मैत्रिणी आहे, हे चाहत्यांना माहितच असेल. सानिया आणि परिणीती नुकत्याच यारों की बारात या कार्यक्रमात एकत्र आल्या होता. दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेता रितेश देशमुख या कार्यक्रमाचे जज आहे. या शोमध्ये सानियाला असा प्रश्न विचारण्यात आला, ज्याबद्दल तिनेही यापूर्वी कधीच विचार केला नसेल.


सानिया मिर्झाने सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटर शोएब मलिकसोबत निकाह केला होता. आता सानिया भारतीय आहे तर शोएब पाकिस्तानी आहे. त्यामुळे सानिया-शोएबचं मूल खेळाडू बनलं तर तो भारतासाठी खेळणार की पाकिस्तानसाठी?, असा प्रश्न सानियाला विचारण्यात आला.

या प्रश्नावर सानिया मिर्झाने शानदार उत्तर दिलं की, "खरं सांगायचं झालं तर आम्हा दोघांमध्ये याबाबत कधीही चर्चा झाली नाही. आम्हाला माहित नाही. कदाचित त्याला खेळाडू बनायचं नसेल, त्याऐवजी अभिनेता, शिक्षक किंवा डॉक्टर बनायचं असेल. ही अजून दूरची गोष्ट आहे. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि शोएबला पाकिस्तानी. पण सध्या आम्हाला पती-पत्नी असल्याचा अभिमान आहे."

सानियाच्या या उत्तरामुळे दोन्ही देशातील लाखो-कोट्यवधी खेळप्रेमींना सध्यातरी दिलासा मिळाला असेल.